तरुण भारत

माजी भाजप नगरसेविकेची हत्या करणाऱ्या आरोपींवर पोलिसांकडून गोळीबार

बेंगळूर/प्रतिनिधी

भाजपच्या माजी नगरसेविका रेखा कादिरेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या पीटर आणि सूर्यावर बेंगळूर पोलिसांनी शुक्रवारी गोळीबार केला. दरम्यान, गुरुवारी शहरातील कॉटनपेटमध्ये रेखा कादिरेश यांच्यावर त्यांच्या घरासमोर आरोपींनी चाकूने वार केले यात माजी नगरसेविका रेखा कादिरेश यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अटक हल्लेखोरांना करण्यासाठी गेल्यावर दोन्ही संशयितांनी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्यावर हल्ला केल्या. यानंतर पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळीबार केला. कॉटनपेट पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीना पकडण्यासाठी गेले असता पीटर आणि सूर्या या दोघांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांवर हल्ला करून अटक टाळण्याचा प्रयत्न करताच कॉटनपेटच्या पोलीस निरीक्षकांनी आरोपीवर गोळीबार केला.

पीटर आणि सूर्य यांना आता उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रेखा यांचे नातेवाईक संजय यांनी आयपीसी कलम ३४, ३०२ अन्वये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदविला आहे.

Advertisements

Related Stories

राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडून 629 कोटी

Amit Kulkarni

कर्नाटक: कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड आकारला जाणार

Abhijeet Shinde

कर्नाटक: मंगळवारी ३९५ नवीन बाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

delta plus variant : कर्नाटकच्या सीमेवर पाळत ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

Abhijeet Shinde

कर्नाटकात ४ लाखाहून अधिक रुग्ण उपचारात

Abhijeet Shinde

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन अतिरिक्त न्यायाधीशांनी घेतली शपथ

Sumit Tambekar
error: Content is protected !!