तरुण भारत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 776 डॉक्टरांचा मृत्यू; बिहार,दिल्लीत सर्वाधिक बळी!

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य लोकांसोबत मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत शेकडो लोकांना आपला जीव गमावावा लागला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृताची संख्या जास्त होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात 776 डॉक्टरांचा मृत्यू झाला. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) शुक्रवारी ही माहिती दिली. IMA ने पहिल्या लाटेत 746 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे सांगितते होते. 

Advertisements


ताज्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू बिहार राज्यातील डॉक्टरांचा झाला आहे. बिहारमध्ये कोरोना महामारीमुळे 115 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सर्वाधिक मृत्यू राजधानी दिल्लीमध्ये झाले आहे. राजधानी दिल्लीमध्ये कोरोना महामारीमुळे 109 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचे आयएमएने सांगितले. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेमध्ये 23 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

  • पाहा कोणत्या राज्यात किती डॉक्टरांचा मृत्यू झाला ? 


बिहार – 115, दिल्ली – 109, गुजरात – 39, तेलंगाना – 37, आंध्र प्रदेश – 40, तमिळनाडू – 50, ओडिसा – 34, केरळ – 24, महाराष्ट्र – 23, मध्य प्रदेश – 16, आसम – 10, छत्तीसगढ – 07, गोवा – 02, हरियाणा – 19, जम्मू-कश्मीर – 03, कर्नाटक – 09, मणिपुर – 06, पुदुचेरी – 01, पंजाब – 03, त्रिपुरा – 02, उत्तराखंड – 02, गुजरात – 39, झारखंड 39, उत्तर प्रदेश – 79, राजस्थान – 44, वेस्ट बंगाल 62, अन्य 1 

Related Stories

माओवाद्यांच्या हालचाली रोखण्यासाठी तामिळनाडू-कर्नाटक सीमेवर सुरक्षा वाढवली

Abhijeet Shinde

लडाख भाजप अध्यक्षपदी फुनचोक स्टेंजिन

Patil_p

चीन पूर्व लडाखमधून सैन्य मागे घेणार

datta jadhav

‘पीएम केअर फंड’च्या वापरासंबंधी याचिका

Patil_p

महिंद्राचा जियोबीपीसोबत करार

Patil_p

अन् रडू लागले विमानातील प्रवासी

Patil_p
error: Content is protected !!