तरुण भारत

राजीनामा दिला तरी मी भाजपमध्येच राहणार : रमेश जारकिहोळी

बेंगळूर/प्रतिनिधी

लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्नाटक भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, रमेश जारकिहोळी यांनी काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रमेश जारकिहोळी यांनी मला पुन्हा मंत्री होण्यात रस नाही. देवेंद्र फडणवीस माझे गॉडफादर आहेत, म्हणूनच मी त्यांना भेटलो, असे ते म्हणेल. २० वर्षांहून अधिक काळ कॉंग्रेसमध्ये राहून मला आदर मिळालेला नाही, तो आरएसएस आणि भाजपाने मला दिला. कॉंग्रेस ही बुडणारी बोट आहे, माझा पुन्हा त्यात बसण्याचा विचारही नाही आमदार रमेश जारकिहोळी यावेळी म्हणाले.

दरम्यान, जारकिहोळी यांनी मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ज्येष्ठ आणि हितचिंतकांच्या सूचनांनंतर मी काही काळ थांबलो. मी आता उघडपणे बोलू शकत नाही, मला आनंद झालेला नाही परंतु मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, मी राजकारणातून राजीनामा देईन पण लवकर नाही असेही आमदार जारकिहोळी म्हणाले.

Advertisements

यावेळी जारकिहोळी यांनी भाजप आणि आरएसएसने मला आदर दिला. मी कॉंग्रेसमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही,जरी त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तरीही. जरी मी राजीनामा दिला तरी मी भाजपमध्येच राहीन. काल कुणीतरी मला सांगितले की ते मला कॉंग्रेसमध्ये घेऊन जातील, पण मी त्याचा विचार केलेला नाही, जारकिहोळी म्हणाले.

Related Stories

महाराष्ट्रात आतापर्यंत 44  हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

मुंबईत संशयित दशतवादी ताब्यात

datta jadhav

 रेल्वेच्या आज 500 हून अधिक गाडय़ा रद्द

prashant_c

देशात उच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

आदेश काढायला ‘तो’ काय राष्ट्रपती आहे काय – नारायण राणे

Abhijeet Shinde

माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या : अब्दुल सत्तार

prashant_c
error: Content is protected !!