तरुण भारत

गेट्स फाउंडेशनमधून वॉरेन बफे बाहेर पडणार

वृत्तसंस्था /न्यूयॉर्क

प्रसिद्ध व्यावसायिक व गुंतवणूकदार म्हणून जगभरात ओळख असणारे वॉरेन बफे बिल ऍण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या विश्वस्थपदाचा राजीनामा देणार आहेत. मागील काही आडवडय़ापूर्वी बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षांच्या सुखी संसाराच्या प्रवासानंतर वेगळे होणार असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतरच बफे यांनी सदर फाउंडेशनमधून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तांपैकी एक आहेत. त्यांच्याजवळ जवळपास 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची संपत्ती आहे. तसेच त्यांची जगभरात दानशूर म्हणूनही वेगळी ओळख राहिली आहे. बिल आणि मेलिंडा फाउंडेशनमधून  आपण राजीनामा देत असल्याचे बफे यांनी नमूद केले आहे.

Advertisements

Related Stories

हेरांबा इंडस्ट्रीजचा बाजारात दमदार प्रवेश

Patil_p

कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर घटवले

Patil_p

एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी मिनी आईप

Patil_p

इमॅक्युअर फार्मास्युटिकलचा येणार आयपीओ

Amit Kulkarni

मॅक्स इंडिया समभागधारकांना 37 टक्क्यांचा जास्त भाव देण्याचे संकेत

Patil_p

पडझडीचा काळ; पण…

Omkar B
error: Content is protected !!