तरुण भारत

248 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास

सध्या कोरोना उदेकामुळे जगभरातील विमानसेवा बव्हंशी बंद आहे. विशेषतः ज्या देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण अधिक प्रमाणात आहे, त्या देशातील विमाने आपल्या देशात येण्यास बऱयाच देशांनी बंदी घातली आहे. तरीही भारताचे एक उद्योगपती एस. पी. सिंह ओबेरॉय यांनी एअरबस-320 या आलिशान विमानातून एकटय़ाने प्रवास करून अमृतसरहून दुबई गाठली.

हे विमान 248 आसन क्षमतेचे होते. सध्या दुबईने भारतातून येणाऱया विमानांवर निर्बंध घातले आहेत. तथापि, त्यातून ओबेरॉय यांना सूट देण्यात आली होती. ओबेरॉय यांचा दुबई आणि संयुक्त अरब अमिरातीत मोठा व्यवसाय आहे. प्रवासी विमानांवर बंदी घातल्याने त्यांनी पूर्ण विमानच भाडय़ाने घेऊन एकटय़ाने प्रवास केला. ओबेरॉय गोल्डन व्हिसाधारक आहेत. अर्थात असे करणारे ते पहिले नाहीत. 19 मे या दिवशी आणखी एक भारतीय वंशाचे उद्योगपती भावेश जव्हेरी यांनी एमिरेट्स एअरलाईन्सच्या 360 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास केला होता. अर्थात ओबेरॉय यांच्याबरोबर विमानाचे चालक आणि एक कर्मचारी इतके लोक होते. भारताचे नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी हस्तक्षेप केल्याने त्यांना भारत ते दुबई अशा विमान प्रवासाची अनुमती मिळाली.

Advertisements

Related Stories

खबरदार ! अभयारण्यक्षेत्रात थर्टीफस्ट कराल तर……

Sumit Tambekar

नेपाळची अविस्मरणीय सहल

tarunbharat

राधानगरी दाजीपूर जंगल सफारी 1 नोव्हेंबर पासून सुरु

Abhijeet Shinde

शांततेच्या मार्गावर काश्मीर

tarunbharat

रेल्वे प्रवासी सेवेतील उत्पन्न 71 टक्क्यांनी घटले

Amit Kulkarni

अशी ही आगळीवेगळी ठिकाणं

tarunbharat
error: Content is protected !!