तरुण भारत

कॅनडातील शाळेत आढळली स्मशानभूमी

कॅनडामधील एका बंद पडलेल्या शाळेत 750 हून अधिक मृतदेहांची स्मशानभूमी सापडल्याने खळबळ उडाली आहे. मागच्या महिन्यातही आणखी एका शाळेत 215 मृतदेह सापडल्याच्या वृत्ताने या देशात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही स्मशानभूमींचा शोध उपग्रहांच्या भूमीछेदक रडारमुळे लागला. या दोन्ही शाळा कॅनडातील मूळचे रहिवासी असणाऱया आदिवासी जमातींच्या वस्त्यांजवळ आहेत. मृतदेह याच जमातीतील लोकांचे असल्याचे सांगण्यात येते. त्यांची हत्या करून या शाळांमध्ये त्यांना पुरले जात असावे, असे अनुमान व्यक्त होत आहे. या जमातींमधील लोकांनी आता या शाळांमध्ये जाऊन मृतदेह उकरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मृतदेहांची संख्या सांगितली जाते त्यापेक्षा बरीच जास्त असावी. हा आदिम जमातींच्या शिरकाणाचा प्रकार असावा, असेही बोलले जाते. कॅनडा सरकारने चौकशीचे आदेश दिले असून वैज्ञानिक चाचण्यांनंतरच या स्मशानभूमींचे रहस्य उलगडण्याची शक्मयता आहे.

Related Stories

मंगळावर पोहोचणारा युएई ठरला पाचवा देश

Amit Kulkarni

युरोपमध्ये दहशत

Patil_p

मेक्सिकोमध्ये 5,714 नवे कोरोना रुग्ण; 579 मृत्यू

Rohan_P

ब्रिटनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी नव्याने निर्बंध

Patil_p

काबुल विमानतळावर १५० भारतीयांचं अपहरण?; तालिबाननं दावा फेटाळला

Abhijeet Shinde

8 सेकंदांसाठी विलगीकरणाचा भंग, मोठा दंड

Omkar B
error: Content is protected !!