तरुण भारत

स्वदेशी युद्धनौकेमुळे वाढणार भारताची ताकद

पुढील वर्षी नौदलात आयएनएस विक्रांतचा समावेश : राजनाथ सिंह यांनी घेतला आढावा

कोची / वृत्तसंस्था

Advertisements

पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या ताफ्यात प्रथम स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत दाखल होणार आहे. या युद्धनौकेमुळे समुद्रात भारताची शक्ती वाढणार आहे. स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत पुढील वर्षापर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार असून भारतीय कोची शिपयार्डमध्ये त्याची निर्मितीप्रक्रिया सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या निर्मितीचा आढावा घेतला. याप्रसंगी संरक्षणमंत्र्यांसमवेत अ?Ÿडमिरल करमबीर सिंह यांच्यासह वरिष्ठ नौदल अधिकारी उपस्थित होते.

आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याची अंतिम चाचणी काही महिन्यात सुरू होईल. भारतीय नौदलाच्या नेव्हल डिझाईन संचालनालयाने (डीएनडी) डिझाईन केले असून कोची येथील कोचीन शिपयार्ड येथे हे निर्मितीकाम करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये युद्धनौकेची प्राथमिक पूर्वतयारी चाचणी पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त या युद्धनौकेचे जलावतरण होणार असल्याने ही देशासाठी एक मोठी भेट असेल, असा दावा संरक्षणमंत्र्यांनी केला आहे.

कोची शिपयार्डसाठी अधिक आर्थिक तरतूद

युद्धनौका निर्मितीचा आढावा घेतल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अधिकाऱयांना संबोधित केले. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताची संरक्षण सज्जता आणखी मजबूत होईल. यासह व्यवसाय, अर्थव्यवस्थेच्या पातळीवरही मानवतावादी मदत बळकट केली जाईल, असे संरक्षणमंत्री म्हणाले. कोची हा भारतातील सर्वात मोठा नौदल तळ असेल, परंतु हा आशिया खंडातील सर्वात मोठा तळ असावा, अशी आमची इच्छा असल्याचे नमूद करत कोची शिपयार्डसाठी केंद्राकडून प्राप्त होणारा निधी वाढविण्याची तयारी संरक्षणमंत्र्यांनी दर्शवली.

Related Stories

”केंद्र सरकारची कोविड रणनीती म्हणजे पहिल्यांदा तुघलकी लॉकडाउन नंतर थाळी वाजवा मग प्रभूगान”

Abhijeet Shinde

हनिट्रपची पेन ड्राइव्ह बाळगून अडकले कमलनाथ

Patil_p

सक्रिय रुग्णसंख्या 25 लाखांसमीप

datta jadhav

राष्ट्रीय महामार्गावर 20 एप्रिल पासून सुरु होणार टोलवसुली

prashant_c

आसाममध्ये काँग्रेसचे दोन आमदार भाजपमध्ये दाखल

Patil_p

दिल्लीत दिवसभरात 1404 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!