तरुण भारत

तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण रखडण्याची चिन्हे

अमेरिकेतील सुनावणी 15 जुलैपर्यंत लांबणीवर

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

Advertisements

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप असणाऱया तहव्वूर राणा याचे भारतातील प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतात तहव्वूर राणा याच्याविरोधात ऑगस्ट 2018 मध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. राणा सध्या अमेरिकन तुरुंगात कैदेत आहे. त्याच्या प्रत्यार्पणासंबंधी नुकतीच लॉस एंजिलिसमधील न्यायालयात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी 15 जुलैनंतर होणार आहे. भारताने राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक सर्व अटी व शर्थी पूर्ण केल्यास त्याला मंजुरी दिली जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. सध्यातरी भारताकडे राणाच्या प्रत्यार्पणासाठी आवश्यक ते सर्व पुरावे आहेत. तथापि, भारताची मागणी फेटाळून लावण्यासाठी राणाने कोणतेही पुरावे अद्याप दिलेले नाहीत.

भारत सरकारच्या विनंतीनुसार अमेरिकेत प्रत्यार्पणाची सुनावणी घेण्यात येत आहे. यामध्ये न्यायाधीश जॅकलीन चूलजियान यांनी सरकारी तसेच बचाव पक्षाच्या वकिलांना आणखी काही कागदपत्रे जमा करण्यास सांगितली आहेत. यासाठी त्यांनी 15 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. न्यायालय अंतिम निर्णय देईपर्यंत तहव्वूर राणा अमेरिकेच्याच तुरुंगात राहील, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केल्यामुळे प्रत्यार्पण प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. न्यायालयातील नोंदीनुसार, अमेरिकन सरकारने याच आठवडय़ात दोनवेळा सीलबंद भारतीय दस्तऐवज न्यायालयात जमा केले होते.

तहव्वूर राणा हा लष्कर-ए-तोयबाचा कट्टरवादी डेव्हिड कोलमन हेडली याचा बालपणीचा मित्र असल्याचा दावा भारताने केला आहे. भारत सरकारच्या विनंतीनंतर राणा याला मुंबई 26/11 हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपांखाली लॉस एंजिलिस येथून 10 जून 2020 रोजी अटक करण्यात आली होती. 59 वषीय राणाचे भारताकडे होत असलेले प्रत्यार्पण उभय देशांत झालेल्या करारानुसार होत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. द्विपक्षीय करारानुसार भारत सरकारने प्रत्यार्पणासाठी औपचारिक मागणी केली असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Related Stories

चोरीचा डाव फसला

Patil_p

पॅलेस्टाईनच्या हल्ल्यात केरळच्या महिलेचा मृत्यू

Patil_p

श्रीलंकेत पाकने आळवला ‘काश्मीर’चा सूर

Patil_p

अमेरिका शिकवणार भारतीयांचे योगदान

Patil_p

तैवानवर हल्ला करण्याचा कट रचतोय चीन

Patil_p

सायबेरियात सापडली 28 हजार वर्षे जुनी सिंहिण

Patil_p
error: Content is protected !!