तरुण भारत

देशात दिवसभरात 51 हजार नवे बाधित

दिवसभरात 1,329 रुग्णांचा मृत्यू ; 64 हजार 527 जणांना डिस्चार्ज

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील नव्या रुग्णांची संख्या अजूनही 50 हजारांच्या आसपास आहे. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात 51 हजार 667 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,329 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 64 हजार 527 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱया स्थानी आहे. तर एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱया स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

मागील वर्षी आलेल्या कोरोना विषाणू संसर्गापासून आतापर्यंत देशात 3 कोटी 1 लाख 34 हजार 445 इतक्या बाधितांची नेंद झाली आहे. एकूण बाधितांपैकी 3 लाख 93 हजार 310 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 91 लाख 28 हजार 267 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. सध्या देशात 6 लाख 12 हजार 868 इतके सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्यामुळे हा आकडा सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. 

24 जूनपर्यंत देशभरात 30 कोटी 95 लाख 16 हजार 402 इतके कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. एकंदर लस लाभार्थींमध्ये 5 कोटीहून अधिक जणांनी दोन्ही डोस घेतले असून 25 कोटी 58 लाख लोकांनी प्रत्येकी एक डोस घेतलेला आहे. शुक्रवारी दिवसभरात 58 लाख 66 हजार 267 डोस देण्यात आले.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 50 हून अधिक रुग्ण

देशात दुसऱया लाटेवर नियंत्रण मिळण्याची शक्मयता निर्माण झाली असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. सध्या देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 50 हून अधिक रुग्ण सापडले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यानंतर आता केंद्र सरकारने या व्हेरिएंटला चिंताजनक व्हेरिएंट जाहीर केले आहे. तसेच चार राज्यांना केंद्र सरकारने हाय अलर्ट दिला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासहित 80 देशांमध्ये सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये भाजपला आणखी एक झटका

Patil_p

संघ मुख्यालयाची ‘जैश’कडून रेकी

Patil_p

शरद पवार यांना डिस्चार्ज

Patil_p

कांद्याची सरकारी किंमत 22 रुपये प्रति किलो

Patil_p

वैमानिक कोरोना पॉझिटिव्ह, मॉस्कोला चाललेले विमान अर्ध्यातून पुन्हा दिल्लीला माघारी

Rohan_P

अयोध्येतील मशिदीचा आराखडा सादर

Patil_p
error: Content is protected !!