तरुण भारत

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जेलभरो आंदोलन सुरू

ऑनलाईन टीम / पुणे : 


ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाला असून राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, बीड, औरंगाबाद, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणी ओबीसी नेते आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisements
  • …तोपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही : पंकजा मुंडे


पुण्यात कात्रज चौकात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, सरकारने 15 महिने वेळकाढूपणा केला आहे. ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक होऊ देणार नाही. असा इशाराच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. 


‘मन मोठे ठेवून निर्णय घेता आले पाहिजे. पण, महाविकास आघाडी सरकार असे कोणतेही निर्णय घेत नाही. त्यामुळे जनता या सरकारला माफ करणार नाही. ओबीसी समाजातील लोकांसोबत भाजप आहे, त्यामुळे आरक्षण मिळवून देणारच, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ‘जोपर्यंत स्थानिका स्वराज संस्थेत ओबीसी आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपने केलेल्या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
  • मुंबईत प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात


मुंबईतही भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर, आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले की, मविआ सरकारने अटक केली किंवा आंदोलन करण्यापासून रोखले, तरी देखील आमचा हा लढा सुरूचं राहील!जोवर ओबीसी समाजाचं सन्मानाचं राजकीय आरक्षण परत मिळत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही!


ओबीसी आरक्षणसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत देखील आंदोलन सुरू झाले आहे. पुष्पराज चौक येथे भाजपाचा चक्का जाम सुरू झाले आहे. त्यामध्ये अठरा पगड जाती धर्माची लोक आपल्या पारंपारिक वाद्यांसह आंदोलनात सामिल झालेली पहायला मिळाली आहेत.

Related Stories

शिवशाहिरांना अखेरचा मुजरा…

Patil_p

बार्शीत भटक्या कुत्र्यांनी तोडले बालकाचे लचके

Abhijeet Shinde

”अफगाणिस्तान दहशतीमागे दोन भारतीयांचा हात ?”

Abhijeet Shinde

राज्यात लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय -आरोग्यमंत्री राजेश टोपे

Abhijeet Shinde

“ज्यांनी जात काढली त्यांच्याच खांद्यावर राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागले”

Abhijeet Shinde

“हिंमत असेल तर अफगाणिस्तानात जा आणि…”; आमदार भातखळकरांचे जावेद अख्तरांना आव्हान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!