तरुण भारत

हाफिजच्या घराबाहेरील स्फोटप्रकरणी परदेशी नागरिक अटकेत

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या लाहोरमधील घराबाहेर झालेल्या स्फोटाप्रकरणी पीटर पॉल डेव्हिड या परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 

Advertisements

हाफीजच्या लाहोरमधील जोहर टाऊन येथील घराबाहेर तीन दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. या स्फोटात 3 जण ठार झाले होते. तर 21 जण जखमी झाले होते. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बाजदार यांनी पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. तपासाअंती पीटर कराचीला जात असताना त्याला विमानातून खाली उतरवून अज्ञात ठिकाणी नेण्यात आल्याचे तसेच स्फोटात वापरलेली मोटार त्याची असल्याचे तपासात समोर आले आहे.

पीटर हा कराची, लाहोर आणि दुबई असा सातत्याने प्रवास करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रवासाबद्दल त्याने माहिती दिली नाही. स्फोटात वापरलेली त्याची मोटार कोण चालवत होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. 

Related Stories

भारतात धावली पहिली डबलडेकर मालगाडी

Patil_p

हाँगकाँगमध्ये प्रसारमाध्यम प्रमुखासह 7 जणांना अटक

datta jadhav

पाकिस्तानात 3,359 नवे रुग्ण

Patil_p

पाकिस्तानात 50 वैमानिकांचे बनावट परवाने रद्द

datta jadhav

आधुनिक उपग्रहाची इराणला रशियाकडून भेट!

Patil_p

कॅनडात ट्रुडो तिसऱयांदा होणार पंतप्रधान

Patil_p
error: Content is protected !!