तरुण भारत

अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी काम करा

सातारा : जिल्ह्यातील महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने विविध विभागांचा सहभाग घेऊन चांगले रोल मॉडेल तयार करावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. 

महिला दक्षता समित्यांचे पुर्नरचना, महिला तसेच बालकांवरील अत्याचार रोखणे याबाबत पोलीस विभागाच्यावतीने पथदर्शी प्रकल्प सातारा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्याचा आढावा आज गृह राज्यमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी मनोज ससे आदीउपस्थित होते. 

Advertisements

महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्याबाबत पथदर्शी प्रकल्प जिह्यात राबविण्यात येणार आहे. पथदर्शी प्रकल्प विविध विभागांचा समावेश घेऊन चांगल्या पद्धतीने तयार करा. अधिवेशन संपात ह्या प्रकल्पाचे रॉल मॉडेल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना दाखविण्यात येईल. हा प्रकल्प  राबविण्यास सुरुवात केल्यानंतर त्याचे दोन ते तीन महिन्यात परिणाम दिसतील. यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करा, अशा सूचना देसाई यांनी बैठकीत केल्या.

Related Stories

सातारा जिल्ह्यात २८ नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱयाच्या बंगल्यात चोरी

Patil_p

कराडमध्ये दीड लाखाचा गुटखा पोलिसांनी पकडला

Patil_p

हेमंत बिस्वा शर्मा होणार आसामचे मुख्यमंत्री

datta jadhav

कोल्हापूर : संभापुरला आर.आर.पाटील सुंदर गाव पुरस्कार कमिटीची भेट

Abhijeet Shinde

सातारा : हिंगणी व बिदाल येथील बंदी आदेश रद्द – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!