तरुण भारत

देशात सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांखाली

दिवसभरात 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण : 1,183 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचे दिसत आहे. मागील पाच दिवसांत दुसऱयादा कोरोनाबाधितांची संख्या ही 50 हजारांच्या खाली आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात देशात 48 हजार 698 नव्या बाधितांची भर पडली आहे, तर 1,183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील 24 तासात देशात 64 हजार 818 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता देशात सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांपेक्षाही खाली आली आहे.

गेल्या पाच दिवसांत दुसऱयांदा 50 हजारांपेक्षा कमी रुग्णांची भारतात नोंद झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 1 लाख 83 हजार 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 कोटी 91 लाख 93 हजार 85 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आपापर्यंत देशात 3 लाख 94 हजार 493 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 95 हजार 565 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोना मृत्यूंचे प्रमाण 1.31 टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. देशात 2 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत जगाच्या तिसऱया स्थानी असून एकूण करोनाबाधितांच्या संख्येत जगात दुसऱया स्थानावर आहे. जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले असून भारत तिसऱया स्थानी आहे. सक्रिय रुग्णांच्या बाबतीतही भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

Related Stories

दिल्लीत 158 नवे कोरोनाबाधित ; 7 मृत्यू

Rohan_P

कुलभूषण यांना उच्च न्यायालयात अपील करण्यास परवानगी

datta jadhav

छत्तीसगडमध्ये महिला नक्षली ठार

Patil_p

भारतात मागील 24 तासात 28,701 नवे कोरोना रुग्ण, 500 मृत्यू

datta jadhav

कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्डला अंतिम अनुमती

Patil_p

कोरोना महामारीतही चीनने रचला कट!

Patil_p
error: Content is protected !!