तरुण भारत

इगतपुरीतील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ‘बिग बॉस’ फेम महिलेसह 22 जणांचा समावेश


नाशिक \ ऑनलाईन टीम

इगतपुरीत रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिला सापडल्या. यामध्ये बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे बंगल्यावर धाड टाकण्यात आली.

इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर छापा टाकण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली.


स्काय ताज विलामध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचं छापेमारीत समजलं. या पार्टीत मनोरंजन विश्वातील चार महिला सापडल्या. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही यात समावेश आहे. एकूण 22 जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं आहे.

Advertisements

Related Stories

मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी जिल्हय़ात आता ‘ट्रीपल ट्री’

Patil_p

सातारा पुन्हा 10 दिवसांचा लॉकडाऊन

Abhijeet Shinde

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान होतं : मंत्री नवाब मलिक

Abhijeet Shinde

सुशांत आत्महत्या : सीबीआय तपासास केंद्राची मान्यता

Rohan_P

यूएईने केल्या लोकसंख्येपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

datta jadhav

एसटी कर्मचारी संप : शरद पवार- अनिल परब यांच्यात बैठक

datta jadhav
error: Content is protected !!