तरुण भारत

”मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा”


मुंबई \ ऑनलाईन टीम


मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला भाजपने ठिकठिकाणी आंदोलनं केली. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारलं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा, असा प्रवीण दरेकर यांनी सल्ला दिला आहे. रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत प्रविण दरेकर सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपने काल संपूर्ण राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणासाठी प्रचंड संघर्ष उभा केला,आंदोलन केलं. मात्र या आंदोलनाला आदळआपट म्हणणं म्हणजे आंदोलकांची किंबहुना ज्या समाजाच्या न्याय हक्कांसाठी भाजपकडून संघर्ष करण्यात आला. त्यांचा अपमान करण्यासारखी किंवा चेष्टा करण्यासारखी गोष्ट आहे. ओबीसी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे ‘आदळआपट’ असं हीणवनं म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखे आहे !, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

संघर्ष कधी करावा, संवादाने प्रश्न सुटतील असे मुख्यमंत्री सांगत असताना, आपण संवाद करत आरक्षणाचा विषय का मार्गी लावला नाही?, असा सवालही दरेकरांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख आहे. संघर्षातून न्याय मिळविणे हा शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. मात्र आज संघर्ष नको असे शिवसेना सांगत आहे. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये असल्याकारणामुळे आज केवळ सत्ता टिकवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकरांनी केली.

Related Stories

पुणे विभागातील 5 लाख 70 हजार 859 रुग्ण कोरोनामुक्त !

Rohan_P

ॲमेझॉन, बिग बास्केटला मद्यविक्रीस परवानगी

datta jadhav

कोरोना काळ म्हणजे सहकार्याचा प्रयोग : रेणू गावस्कर

Rohan_P

कोल्हापुरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या अडीचशेवर

triratna

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना सदाचार आणि संस्कृतीला विसरु नका : भतसिंग कोश्यारी

Rohan_P

पंजशीरमधील तालिबानच्या चौक्यांवर एअर स्ट्राईक

datta jadhav
error: Content is protected !!