तरुण भारत

खासगी कंपन्या करणार रॉकेटचे प्रक्षेपण

तामिळनाडूत निर्माण होणार नवे स्पेसपोर्ट – इस्रोकडून खासगी कंपन्यांना लाँचपॅड निर्मितीचा प्रस्ताव

वृत्तसंस्था  / चेन्नई

Advertisements

भारतात आता खासगी कंपन्या देखील रॉकेट प्रक्षेपित करू शकतील. सरकारची अनुमती प्राप्त करत देशात आणि देशाबाहेर रॉकेट लाँच साइट तयार करून त्यांना प्रक्षेपित करण्याची मुभा खासगी कंपन्यांना मिळाली आहे. तसेच भारताचा अंतराळ विभाग इस्रोचे प्रक्षेपणस्थळ तयार करण्याची संधी दिली जाणार आहे. याकरता इस्रोने स्वतःच्या नव्या अंतराळ धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे.

इस्रोचे पहिले आणि एकमात्र सतीश धवन स्पेस सेंटर आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथे आहे. आता असेच दुसरे अंतराळ केंद्र तामिळनाडूच्या कुलसेकरपट्टिनमनजीक थूथुकुडीमध्ये तयार केले जात आहे. याकरता इस्रोने देशातील खासगी कंपन्यांना संधी देण्याचा विचार चालविला आहे.

कंपन्यांना इन-स्पेसईकडून (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोश अँड ऑथरायजेशन सेंटर) सहमती घ्यावी लागणर आहे. इन-स्पेसई इस्रोचाच हिस्सा असला तरीही स्वतंत्रपणे काम करतो. अंतराळ क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी हा विभाग तयार करण्यात आला आहे.

हिस्सेदारी वाढणार

खासगी कंपन्या इस्रोसोबत भागीदारी करू शकतात आणि अंतराळ वाहतुकीत भविष्यातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. नॅशनल स्पेस ट्रान्सपोर्टेशन पॉलिसीद्वारे भारताच्या खासगी कंपन्यांच्या जागतिक स्तरावर लाँच सेवांच्या बाजारपेठेत हिस्सेदारी वाढणार असल्याचे विधान डिपार्टमेंट ऑफ स्पेसचे प्रमुख के. सिवन यांनी केले आहे. लाँच व्हेईकल निर्मिती आणि प्रक्षेपणासह, खासगी कंपन्या स्वतःचे प्रक्षेपणस्थळ तयार करू शकतात. तसेच इस्रोच्या प्रक्षेपणस्थळांचा वापर करू शकतात असेही त्यांनी म्हटले आहे.

कंपन्यांना करता येणार सूचना नॅशनल स्पेस लाँच पॉलिसीच्या मसुदा 2020 नुसार दिशानिर्देश आणि प्रक्रियेचे स्वरुप विशद करण्यात आले आहे. यात 21 जुलैपर्यंत कंपन्यांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. नॅशनल ट्रान्सपोर्ट स्पेस पॉलिसी 2020 चा उद्देश अंतराळ वाहतूक व्यवस्थेत खासगी कंपन्यांना संधी देणे आहे.

Related Stories

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p

महाराष्ट्रात 14,492 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

लडाखमध्ये भारताची आघाडी

Patil_p

मध्यप्रदेश : कोरोनाची लस मी आत्ताच घेणार नाही : शिवराज सिंह चौहान

Rohan_P

जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रे जप्त

datta jadhav

‘योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!