तरुण भारत

भारत-जपान संबंध अत्यंत बळकट

पंतप्रधानांकडून जेन गार्डन, कैजान अकॅडमीचे उद्घाटन

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अहमदाबाद प्रबंधन संघात जपानी जेन गार्डन आणि कैजान अकॅडमीचे डिजिटली उद्घाटन केले आहे. जेन गार्डन आणि कैजान अकॅडमीच्या लोकार्पणाची ही संधी भारत-जपान संबंधांमधील सहजता आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे. जपानी जेन गार्डन, कैजान अकॅडमीची स्थापना दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करणार असल्याचा विश्वास आहे, असे उद्गार मोदींनी यावेळी काढले आहेत.

बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. बंकिम चंद्र यांनी स्वतःच्या व्यापक कार्याच्या माध्यमातून भारताच्या महानतेला जगासमोर मांडले, त्यांनी लिहिलेले वंदे मातरम् आम्हाल विनम्रतेसह भारताची सेवा करण्यासाठी प्रेरित करत असल्याचे मोदी म्हणाले.

भारत आणि जपान बाहेरील प्रगती आणि समृद्धीसाठी समर्पित राहिले आहेत. याचबरोबर या दोन्ही देशांनी अंतर्गत शांती आणि प्रगतीलाही महत्त्व दिले आहे. जपानी जेन गार्डन शांतीच्या या शोधाची, या साधेपणाची सुंदर अभिव्यक्ती असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

जपानच्या एकाहून एक सरस कंपन्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. अशा कंपन्यांची संख्या 135 हून अधिक असल्याचे सांगण्यात आले. ऑटोमोबिलपासून बँकिंगपर्यंत, कंस्ट्रक्शनपासून फार्मापर्यंत, प्रत्येक क्षेत्रातील जपानी कंपनीने गुजरातमध्ये प्रकल्प उभारला असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

भारत आणि जपान यांच्याकडे शतकांपेक्षा जुना सांस्कृतिक संबंधांचा मजबूत विश्वास आणि भविष्यासाठी सामायिक दृष्टीकोन देखील आहे. याच आधारावर मागील अनेक वर्षांपासून स्वतःची विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी आम्ही सातत्याने मजबूत करत आहोत असे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.

Related Stories

उत्तराखंडात पावसाचा धुमाकूळ, 23 ठार

Patil_p

देशात संक्रमणाचा वेग मंदावला

datta jadhav

अफगाण मुद्यावर आज सर्वपक्षीय चर्चा

Patil_p

बारामुल्ला येथील चकमकीत लष्करी अधिकारी जखमी

datta jadhav

“…या चर्चा जाहीरपणे सांगण्यासारख्या नाहीत”; मुख्यमंत्री ठाकरे आणि दरेकरांमध्ये बंद दाराआड चर्चा

triratna

‘एमबीबीएस-फायनल’चे विद्यार्थी कोविड सेवेत ?

Patil_p
error: Content is protected !!