तरुण भारत

पद्मश्री, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांचे निधन

प्रतिनिधी /पणजी

जुन्या काळातील नामवंत पत्रकार, संपादक, लेखक तसेच स्वातंत्र्यसैनिक लॅम्बर्ट मास्करेन्हास यांचे वयाच्या 106 व्या वर्षी वृद्धापकाळाने काल रविवारी 27 जून रोजी निधन झाले. दोनापावला येथे राहत्या घरी त्यांनी अखेरच श्वास घेतला. त्यांना भारत सरकारचा पद्मश्री व गोवा सरकारचा गोमंत विभूषण हे किताब मिळाले होते.

Advertisements

 गोमतंकीय राष्ट्रप्रेमी पत्रकार अशी त्यांची ओळख होती. गोव्यात 17 सप्टेंबर 1914 साली जन्म झालेल्या मास्कारेन्हास यांनी पुणे, मुंबईतच आपली पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. गोवामुक्तीलढय़ात त्यांचे मोठे योगदान आहे.

पोर्तुगीज राजवटीवर जोरदार हल्लाबोल

 आपल्या लेखणीद्वारे पोर्तुगीज राजवटीवर जोरदार हल्लाबोल केला. गोमंतकीय जनतेची पोतुगीजांनी कशी छळवणूक केली याचे सचित्र दर्शन त्यांनी संपूर्ण देशाला घडविले. त्यांना गोव्यात अटक करून हद्दपार करण्यात आले. मात्र त्यांनी आपल्या धारदार लेखणीतून गोवामुक्ती लढय़ास प्रोत्साहन दिले. मुंबईतील विविध इंग्रजी वृत्तपत्रांत त्यांनी काम करून गोमंतकीय पत्रकारितेची ओळख दाखविली.

गोवा पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त झाल्यानंतर ते पुन्हा गोव्यात आले. त्यांनी पत्रकारितेतील धारदार लेखणी पुन्हा सुरू केली. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून गोवा टुडे हे नियतकालिक त्यांनी चालू केले तसेच ते ‘नवहिंद टाईम्स’चे  संपादकही झाले. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवा क्रांतीची मशाल पेटविल्यानंतर गोव्यातील विविध घटनांची माहिती त्यांनी एका इंग्रजी पुस्तकातून कथन केली आहे. ‘द फर्स्ट सिटी’, ‘ग्रेटर ट्रेजेडी’, ‘हार्टब्रेक पेसेज’ ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. 2004 मध्ये त्यांना लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये गोमंत विभूषण तर 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘गुज’ पत्रकार संघटनेतर्फे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. गोव्यातील पत्रकारितेतील एक मोठा माणूस म्हणून त्यांची ख्याती होती.

 धक्कादायक व दुःखदायक – श्रीपाद नाईक  थोर स्वातंत्र्यसैनिक व ज्ये÷  पत्रकार लॅम्बर्ट मास्कारेन्हास यांच्या निधनाचे वृत्त मोठे धक्कादायक व दुःखदायक आहे. गोव्याच्या मुक्तीसाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण असेच आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो व  हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना देवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

Related Stories

साखळीत चक्क महिलांनी बांधली तिरडी

Amit Kulkarni

बेतोडा-निरंकाल रस्त्यावर झाडे धोकादायक स्थितीत

Omkar B

मर्जीनुसार न वागणाऱया अधिकाऱयांचे खच्चिकरण

Amit Kulkarni

आमदार पात्रता आव्हान याचिकेला मिळेना मुहूर्त!

Amit Kulkarni

शेती करता येत नसल्याने नुकसानभरपाई द्यावी

Omkar B

गोल्डन बूटधारक इगोर अँग्युलो देणार ओडिशासाठी एफसी गोवाला सोडचिठ्ठी

Amit Kulkarni
error: Content is protected !!