तरुण भारत

…तर कर्नाटकात पुन्हा गंभीर परिस्थिती

तांत्रिक सल्लागार समितीची खबरदारी घेण्याची सूचना

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आणि महाराष्ट्र अनलॉक झाल्याने राज्यात पुन्हा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तात्काळ हाती घ्याव्या लागणाऱया उपाययोजनांची यादी तांत्रिक सल्लागार समितीने राज्य सरकारकडे पाठविली आहे. तसेच घाईगडबडीने लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता न आणण्याची सूचनाही केली आहे.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आल्याने केंद्राने राज्य सरकारला खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. तात्काळ त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना, गर्दी टाळणे, मोठय़ा प्रमाणात कोरोना चाचणी कराव्यात आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आलेल्या जिल्हय़ाला प्राधान्य देऊन लसीकरण करावे, असे केंद्र सरकारने सांगितले आहे. डेल्टा प्लसवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी तांत्रित सल्लागार समितीने शनिवारी बैठक घेऊन सर्व जिल्हय़ांमध्ये आतापासूनच खबरदारी घेण्याची सूचना केली आहे, असे सूत्रांकडून समजते. राज्यात कोरोना नियमांचे पालन न केल्याने राज्यात दररोज सरासरी 4 हजार रुग्ण आढळून येत आहेत.

Related Stories

अलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

Abhijeet Shinde

कर्नाटक: शुक्रवारी दिल्लीला जाणार- मुख्यमंत्री बोम्माई

Abhijeet Shinde

शिवाजी महाराजांचे पूर्वज कन्नड होते : उपमुख्यमंत्री

Abhijeet Shinde

राज्यात कोल्ड स्टोरेज सुविधांची कमतरता नाही : मंत्री सुधाकर

Abhijeet Shinde

वीजनिर्मिती क्षेत्रात स्वावलंबी व्हा

Amit Kulkarni

कर्नाटक: चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील १,१२० पेक्षा जास्त गावे कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!