तरुण भारत

गुड न्यूज : मुंबईतील 50 टक्क्यांपेक्षा अधिक मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लात ओसरत नाही तोवर  तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसेल असे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. 

Advertisements


मुंबई पालिकेने लहान मुलांना होणार धोका लक्षात घेता एक सेरो सर्व्हे केला होता. यामध्ये मुंबईतील सुमारे 50 टक्क्यांहून अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील एकूण 24 वॉर्डमध्ये मे आणि जून या महिन्यांमध्ये 6 ते 18 या वयोगटातील मुलांमध्ये सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एकूण 10 हजार मुलांचे नमुने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीअंती त्यातील 50 टक्क्यांहून अधिक मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.  मुंबईकरांसाठी ही एक मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.


दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई सज्जकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबईची सज्ज झाली असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबईत 7 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत एकूण 5 ठिकाणी कोव्हीड सेंटर उभाण्यात आली आहेत. यात मालाड, महालक्ष्मी, सोमय्या ग्राऊंड, नेस्को सेंटर 2 आणि कांजूरमार्ग या पाच ठिकाणांचा समावेश आहे.

Related Stories

चिंता वाढली : औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 742 वर

Rohan_P

देशाचे वैभव वाढविणे, हेच ‘आत्मनिर्भर’तेचे उद्दिष्टय़

Amit Kulkarni

पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2,57,914 वर

Rohan_P

जम्मू काश्मीर : 31 जानेवारीपर्यंत राहणार लॉकडाऊन

Rohan_P

‘या’ मंत्र्याच्या मुलाने पॅरिसच्या आयफेल टॉवरवर एका मुलीला केला प्रपोज

Abhijeet Shinde

यूपी अनलॉक : आता केवळ नाईट कर्फ्यूचे नियम लागू

Rohan_P
error: Content is protected !!