तरुण भारत

मळगांव घाटीतील मोरीचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर

मंगळवार सकाळपासुन घाटरस्ता दुचाकी व रिक्षांसाठी खुला होणार

ओटवणे / प्रतिनिधी-

Advertisements

मळगांव घाटीतील कोसळलेल्या ब्रिटीशकालीन मोरीचे काम अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आले आहे. या मोरीच्या दोन्ही पाईप लाईनवरील काँक्रीटच्या भरावाचे काम सोमवारी रात्री पूर्ण करण्यात येणार असून मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व तीन आसनी रिक्षांसाठी खुला होणार असल्याचे सार्वजनिक बांधकामचे उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी स्पष्ट केले.


ऐन पावसाच्या तोंडावरच मळगाव घाटीतील ही मोरी खचल्यामुळे शिरोडा – सावंतवाडी हा राज्य मार्ग वाहतूकीसाठी धोकादायक झाला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा घाट रस्ता बंद करून ही मोरी बांधण्याचा निर्णय प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी घेतला होता. त्यामुळे तब्बल ११ किलोमीटरचा फेरा मारून निरवडे, मळगाव, न्हावेली, मळेवाड आदी भागातील लोकांना सावंतवाडीत यावे लागत आहे. पर्यायाने मोरीचे हे काम लवकरात-लवकर पूर्ण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ऐन पावसाळ्यात या मोरीचे बांधकाम करणे आव्हाात्मक होते. मात्र त्यावर मात करून गेल्या आठ दिवसाच्या अहोरात्र प्रयत्नानंतर आणि अधिकारी वर्गाने योग्य नियोजन करून या मोरीचे बांधकाम पूर्णत्वास नेले.

यावेळी उपअभियंता अनिल आवटी यांनी पावसाने उसंत घेतल्यामुळे या मोरीच्या बांधकामास गती मिळाली. त्यामुळे मंगळवार सकाळपासुन हा घाट रस्ता दुचाकी व रिक्षासाठी सुरू होणार असुन या मोरीचे इतर बांधकाम सुरू राहणार आहे. तसेच इतर वाहतुकीबाबत येत्या दोन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Related Stories

रत्नागिरी : कोयना अवजल प्रकल्प ठरणार रिफायनरीची पूर्वतयारी?

Abhijeet Shinde

मुंबईतील चाकरमान्यांना घेऊन पहिली लालपरी मंडणगड तालुक्यात दाखल

Abhijeet Shinde

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किल्ल्याचा ‘जागतिक वारसा नामांकन’ प्रस्ताव तत्वत: मान्य

NIKHIL_N

तब्बल सात महिन्यानंतर पुन्हा गजबजला देवरुखचा आठवडा बाजार

Patil_p

तेरावे-चौदावे केल्याबद्दल गावाचा बहिष्कार

Patil_p

आंबोलीत मोठी दुर्घटना टळली

NIKHIL_N
error: Content is protected !!