तरुण भारत

सातारा : पेरलेनजीक महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

प्रतिनिधी / नागठाणे

ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावरुन पेरले (ता.कराड) गावानजीक दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावले. रविवारी दुपारी ही घटना घडली.रात्री उशिरा याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा संतोष कांबळे (वय 30, रा. कामेरी, ता. सातारा) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्या पती तसेच दोन मुलांसह दुचाकीवरुन माहेरी निघाल्या होत्या. या दरम्यान पेरले फाट्यानजीक पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावरील मागे बसलेल्या चोरट्याने मनीषा कांबळे यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले.त्यात मंगळसूत्र,गंठनसह दोन तोळ्यांचे सुमारे ४० हजार रूपयांचे दागिने पळविण्यात चोरटे यशस्वी झाले.

दोन्ही चोरटे ३५ ते ४० वयोगटातील होते. त्यांच्याकडे निळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल होती. घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

Advertisements

Related Stories

भुईंजच्या पाच जणांची 75 लाखांची फसवणूक

Patil_p

सोनगाव कचरा डेपोनजीक उसाचा ट्रॅक्टर पलटी

Abhijeet Shinde

अष्टपैलू कर्तृत्व… साधना गावडे

datta jadhav

बोरगाव पोलिसांची खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई

datta jadhav

शहीद श्रीमंत काळंगे अनंतात विलीन

datta jadhav

सातारा : जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्व : हणमंतराव शिंदे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!