तरुण भारत

टोळधाडीच्या विरोधात भारत-पाकची संयुक्त मोहीम

इराण अन् अफगाणिस्तानातून येणार नाही टोळधाड – संयुक्त राष्ट्रसंघाकडून कौतुक

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ

Advertisements

चालू वर्षात भारतात टोळधाडीचे आक्रमण होणार नाही. इराण-पाकिस्तान मार्गे येत देशातील पीक फस्त करणाऱया टोळधाडीची वाढ यंदा मोठय़ा प्रमाणावर होऊ शकलेली नाही. भारत-पाकिस्तानच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे. भारत-पाकिस्तानच्या संयुक्त मोहिमेचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या खाद्य तसेच कृषी संस्थेचे वरिष्ठ लोकस्ट फोरकास्टिंग अधिकारी कीथ क्रेसमान यांनी कौतुक केले आहे. मागीलवर्षी भारत आणि पाकिस्तानने 50 कोटींहून अधिक टोळधाडींचे आक्रमण झेलले होते. पण यंदा दोन्ही देशांनी मिळून टोळधाडींची दहशत मोडून काढली असल्याचे क्रेसमान म्हणाले.

भारत आणि पाकिस्तानच्या सरकारी लोकस्ट मॉनिटरिंग संस्थांनी मिळून अत्यंत उत्तम काम केल्याने शेतकऱयांना चिंता करण्याची गरज नाही. पिकांना टोळधाडींपासून कुठलाच धोका नसल्याने ते चांगल्या पिकाची अपेक्षा बाळगू शकतात असे क्रीथ यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानात टोळधाडीवर नजर ठेवण्यासाठी लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायजेशन आहे. भारतात ही संस्था कृषी मंत्रालयाच्या अधीन आहे.

आफ्रिकेने धडा घ्यावा

मागील वर्षापासूनच दोन्ही देशांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे टोळधाडींच्या वाढीला संधीच मिळाली नाही. यंदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणमध्ये टोळधाडींचे प्रमाण नसल्यात जमा आहे. उत्तर-पूर्व आफ्रिका आणि सौदी अरेबियातही आता स्थिती सुरळीत आहे. भारतात कुठूनही टोळधाड दाखल होण्याची शक्यता नाही. भारत-पाकिस्तानप्रमाणेच आफ्रिकेने गांभीर्य दाखविल्यास टोळधाडींच्या हल्ल्याच्या समस्येपासून जगाला मुक्तता मिळू शकते असे उद्गार क्रीथ यांनी काढले आहेत.

भारत-पाकमध्ये देवाणघेवाण

टोळधाड वाळवंटयुक्त भूमीत अंडी घालत असतात. भारतातील राजस्थानात वनीकरण वेगाने होत असल्याने टोळधाडींना पुरक क्षेत्र कमी होत चालले आहे. अशा स्थितीत टोळधाडींना जैसलमेरचे पश्चिम क्षेत्र तसेच पाकिस्तानच्या सीमावर्ती भागांना स्वतःची संख्या वाढविण्यासाठी निवडावे लागत आहे. येथेच दोन्ही देशांच्या संस्था तत्परपणे काम करत आहेत. परस्परांना डाटा शेअर करण्यासह योग्य पावलेही उचलत असल्याचे क्रीथ म्हणाले

टोळधाडीचे आक्रमण

वाळवंटी टोळधाडीचे निरीक्षण करणे अत्यंत अवघड काम आहे, कारण टोळधाडीला अत्यंत प्रतिकूल स्थितीतही तग धरण्याचे कौशल्य प्रापत आहे. टोळधाड मानवापेक्षाही पूर्वीपासून पृथ्वीवर असल्याचे मानले जाते. टोळधाडीच्या झुंडमध्ये त्यांची संख्या कोटीत असते आणि ते एका दिवसात 35 लाख लोकांना पुरेल इतके धान्य फस्त करतात. टोळधाडीला पूर्णपणे नष्ट करता येत नाही. पण त्यांना केवळ झुंडीत रुपांतरित होण्यापासून रोखले जाऊ शकते, याकरता अनेक देशांच्या सरकारांनी मिळून काम करण्याची गरज आहे.

Related Stories

युरोपात 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण

datta jadhav

समाजाप्रती कृतज्ञता भावनेतून काम केल्यास घडते चांगले कार्य : महापौर

Rohan_P

पाकच्या लष्करी मुख्यालयाजवळ बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू

datta jadhav

‘मोती’ ठरला भाग्यविधाता

Patil_p

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा

datta jadhav

म्यानमारमध्ये निदर्शकांवर पुन्हा गोळीबार

Patil_p
error: Content is protected !!