तरुण भारत

पियाजियोने दुचाकी विक्री केंद्रे केली सुरू

कोरोना लाट ओसरल्याने कंपनीचा निर्णय – केंद्रांमध्ये खबरदारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

दुचाकी क्षेत्रातील कंपनी पियाजियोकडून कोरोना महामारीमुळे रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहून खबरदारी घेत विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती पण आता निर्बंध मागे घेण्यात आल्याने भारतभरातील दुचाकी विक्री केंद्रे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. यासंबंधीची माहिती पियाजियोकडून नुकतीच देण्यात आली.

एप्रिल व मे या दरम्यान कंपनीने देशभरातील विविध विक्री केंद्रे बंद केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव पाहून पियाजियो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा निर्णय घेतला होता. इटालियन ऑटो क्षेत्रातील कंपनी पियाजियो गुपची ही सहकारी कंपनी आहे. कंपनीच्या व्हेस्पा, एप्रिला स्कुटर्स लोकप्रिय ठरल्या आहेत. कंपनीने आपल्या मूळ सुटय़ा भागांवर वॉरंटी आणि मोफत सेवा वाढवून दिली आहे. देशभरातील विक्री व सेवा केंद्रे आता पूर्णपणे कार्यरत झाली असल्याची माहिती पियाजियो इंडियाचे चेअरमन डिअगो ग्राफि यांनी दिली आहे. पण हे करताना कोरोनासंबंधीची सर्व पूर्वदक्षता मात्र या केंद्रांमध्ये घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

एडीक्युची बायजूमध्ये गुंतवणूक

Patil_p

सुरूवातीची तेजी बाजाराने अंतिमक्षणी गमावली

Patil_p

टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये घेणार वाटा

Omkar B

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर ब्रेक

Patil_p

रोजगार संधींमध्ये 57 टक्के दमदार वाढ

Patil_p

शेअर बाजाराची तेजीची घोडदौड कायम

Patil_p
error: Content is protected !!