तरुण भारत

81 वर्षीय वृद्धेने पूर्ण केली मड रेस

अमेरिकेच्या मिसौरी प्रांतातील 81 वर्षीय महिला मिल्ड्रेड विल्सन यांनी या वयात देखील 5 किलोमीटरची अवघड मड रेस पूर्ण करण्याची कामगिरी करून दाखविली आहे. त्यांनी मार्च 2021 मध्ये झालेल्या मड रेसमध्ये येणारी प्रत्येक अडथळा ओलांडून ही शर्यत जिंकण्यास दुसऱयांदा यश मिळविले आहे. यापूर्वी 2019 मध्येही त्यांनी मड रेस जिंकली होती. तेव्हा त्या 80 वर्षांच्या होत्या. या शर्यतीसाठी त्यांनी सर्वप्रथम वैद्यकीय चाचणी पूर्ण केली होती.

मड रेससाठी दिले जाणारे प्रशिक्षण मला वाटायचे तितके अवघड नसल्याचे मिल्ड्रेड यांचे मानणे आहे. विल्सन यांच्या पतीने नेहमीच त्यांना प्रोत्साहन दिले. 2019 मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले होते. स्वतःच्या दिवंगत पतीच्या सन्मानार्थ त्यांनी यंदाची रेस जिंकली आहे. ही रेस जिंकण्याचे अवघड काम केल्याने आता जगातील कुठलेही काम पूर्ण करू शकते असे विल्सन यांचे मानणे आहे.

Advertisements

Related Stories

चंद्राच्या पुजाऱयाच्या ‘ममी’चे सिटी स्कॅन

Amit Kulkarni

पाकिस्तानचा पंतप्रधान कुचकामी !

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरवर 15 ऑगस्टला फडकणार तिरंगा

datta jadhav

पाकला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जोरदार झटका

datta jadhav

अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्राचे नोबेल

Patil_p

फ्रान्समध्ये तिसरी लाट

datta jadhav
error: Content is protected !!