तरुण भारत

महिला क्रिकेटपटू अन्शुला राववर डोपिंगमुळे चार वर्षांची बंदी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मध्य प्रदेशकडून अनेक स्पर्धामध्ये खेळणारी महिला अष्टपैलू क्रिकेटपटू अन्शुला राव उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय नाडाच्या पॅनेलने जाहीर केला आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरणारी राव ही भारताची पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

Advertisements

अन्शुला राव ही भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाची अधिकृत नोंद झालेली महिला क्रिकेटपटू आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघटना ही बीसीसीआयशी संलग्न आहे. 2019-20 साली झालेल्या बीसीसीआयच्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत रावने आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. गेल्यावर्षी 14 मार्च रोजी बडोदा येथे रावची उत्तेजक चाचणी घेण्यात आली आणि त्यात निर्बंध घातलेले द्रव्य आढळल्याने तिच्यावर नाडाच्या शिस्तपालन पॅनेलने चार वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

सुपर एक्स्प्रेस अर्जुन स्पोर्ट्स, एक्सेस इलाईट हुबळी संघ विजयी

Omkar B

मेलबर्न रिनेगेड्सचे नेतृत्व मॅडिसनकडे

Amit Kulkarni

कोविड-19 हेल्पलाइनमध्ये दोन आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू

Patil_p

भारताकडून जर्मनीचा एकतर्फी धुव्वा

Patil_p

स्टोक्सने पटकावले अष्टपैलूचे अग्रस्थान

Patil_p

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Patil_p
error: Content is protected !!