तरुण भारत

कोल्हापूरच्या राही सरनोबतने जिंकली ऑलिम्पिकची रंगीत तालीम

क्रोएशियातील आयएसएसएफ नेमबाजी विश्व चषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

ओस्जेक / वृत्तसंस्था

Advertisements

कोल्हापूरची ऑलिम्पिक-पात्र आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतने आपला जबरदस्त फॉर्म अधोरेखित करताना आयएसएसएफ नेमबाजी विश्व चषक स्पर्धेत सुवर्णवेध घेतला आणि ऑलिम्पिकसाठी आपली तयारी योग्य ट्रकवर असल्याचे दर्शवून दिले. महिलांच्या 25 मीटर्स पिस्तोल गटात तिने सुवर्णपदकाची कमाई केली. याचवेळी टीन सेन्सेशन मनू भाकर मात्र या गटात सातव्या स्थानी फेकली गेली.

राही सरनोबतने सर्वोच्च यश संपादन केल्यानंतर भारतासाठी या स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक देखील ठरले. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 1 रौप्य व 1 कांस्यपदकाची कमाई केली असून त्यावर राहीने यशाचा सोनेरी कळस चढवला.

30 वर्षीय राहीने 39 चा फायनल स्कोअर नोंदवला. त्यापूर्वी एकूण 591 गुणांसह ती दुसऱया स्थानी झेपावत अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. फायनलमध्ये तिसऱया, चौथ्या, पाचव्या व सहाव्या सिरीजमध्ये तिने परफेक्ट स्कोअर नोंदवत सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली.

‘सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर मी माझ्या खेळातील तांत्रिक बाजूंवर अधिक लक्ष केंद्रित करत शेवटच्या काही सिरीजमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवले. माझ्या दृष्टीने ही स्पर्धा आपली कामगिरी किंवा पदक जिंकणे यापुरती अजिबात मर्यादित नव्हती तर येथे ऑलिम्पिकपूर्वी आपल्या तयारीवर अंतिम हात फिरवणे आणि काही नवे प्रयोग करुन पाहणे, हा मुख्य उद्देश होता’, असे राही आपल्या इव्हेंटनंतर म्हणाली. अर्थात, येथे सुवर्ण जिंकल्याने ऑलिम्पिकची तिची तयारी योग्य दिशेने सुरु आहे, याचा देखील दाखला मिळाला आहे.

‘ऑलिम्पिकमध्येही असाच धडाका कायम राखण्यासाठी माझे प्रयत्न असतील’, याचा राहीने यावेळी उल्लेख केला आहे. या इव्हेंटमध्ये फ्रान्सची मॅथिल्डे लॅमोलेने रौप्य संपादन केले. अंतिम फेरीत तिने 31 गुण कमावले होते. रिओ ऑलिम्पिकची रौप्यजेती रशियन नेमबाज व्हितालिना येथे 28 गुणांसह तिसऱया स्थानी राहिली. या स्पर्धेच्या क्वॉलिफिकेशन राऊंडमध्ये तिने रॅपिड फायर गटात 296 अंक प्राप्त केले. रविवारी प्रीसिजन राऊंडमध्येही तिने 292 अंक मिळवले होते.

दुसरीकडे, मनू भाकरने सपशेल निराशा केली. भाकरने सोमवारी रॅपिड फायर फेरीत 588 गुण मिळवत आगेकूच केली. यात रॅपिड फायरमध्ये 296 व प्रीसिजन राऊंडमधील 292 गुणांचा समावेश होता. मात्र, अंतिम फेरीतून 11 या खराब स्कोअरसह ती बाहेर फेकली गेली. बल्गेरियाच्या व्हिक्टोरियाविरुद्ध शूटऑफमध्ये तिला पराभव पत्करावा लागला. भाकरने मिश्र गटात सौरभ चौधरीसह 10 मीटर्स एअर पिस्तोलचे रौप्य तर राही सरनोबत, यशस्विनी देस्वाल यांच्यासह महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्तोलचे कांस्य जिंकले आहे. सर्व नेमबाजांसाठी ही ऑलिम्पिकपूर्वी शेवटची व्यावसायिक स्पर्धा आहे.

Related Stories

मिताली, अश्विनची खेलरत्नसाठी शिफारस

Patil_p

मध्यप्रदेश सरकारकडून महिला हॉकी संघाचा गौरव

Patil_p

सध्याच्या संघात केवळ दोनच रोल मॉडेल

Patil_p

बोल्ट, मिल्ने, नीशमचे चेन्नईत आगमन

Patil_p

टेलर, कायतानो यांची अर्धशतके

Patil_p

धोनीची जागा भरुन काढू शकणार का? राहुल म्हणतो, निश्चितच नाही!

Omkar B
error: Content is protected !!