तरुण भारत

क्विटोव्हा, सित्सिपस पहिल्याच फेरीत पराभूत

वृत्तसंस्था/ लंडन

पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत दोन वेळा जेतेपद मिळविणारी पेत्र क्विटोव्हा तसेच तिसरा मानांकित स्टेफानोस सित्सिपस यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. माजी विजेत्या स्पेनच्या गार्बिन मुगुरुझाने दुसरी फेरी गाठताना फिओना फेरोचा पराभव केला.

Advertisements

अमेरिकेच्या स्लोअन स्टीफेन्सने झेकच्या दहाव्या मानांकित क्विटोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. क्विटोव्हाने 2011 व 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. स्टीफेन्सची पुढील लढत क्रिस्टी आन किंवा ब्रिटनची हीदर वॅटसन यापैकी एकीशी होईल. मुगुरुझाने फ्रान्सच्या फेरोचा 6-0, 6-1 असा केवळ 49 मिनिटांत धुव्वा उडवित दुसरी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत ग्रीसच्या तिसऱया मानांकित सित्सिपसचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्याला अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफोने 6-4, 6-4, 6-3 असे नमवित स्पर्धेबाहेर घालविले. पेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर सित्सिपस पहिल्याच सामन्यात खेळत होता. यापूर्वी 2019 मध्येही सित्सिपस पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. टायफोची पुढील लढत स्पेनचा रॉबर्टो बाएना किंवा कॅनडाचा पॉस्पिसिल यापैकी एकाशी होईल.

Related Stories

कॅनडाच्या अँड्रेस्क्यूला कोरोनाची लागण

Patil_p

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

Omkar B

बिग बॅश लीगचे वेळापत्रक जाहीर

Patil_p

युरोपियन ऍथलेटिक्स स्पर्धा रद्द

Patil_p

भुवनेश्वर कुमारवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया

Patil_p

आरसीबी जिंकली…चर्चा तर होणारच!

Amit Kulkarni
error: Content is protected !!