तरुण भारत

गोवा क्रिकेट संघटनेतर्फे कोविड रूग्णांवरील उपचारांसाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध

प्रतिनिधी /वास्को

गोवा क्रिकेट संघटनेने कोरोना रूग्णांवरील उपचारांसाठी प्रत्येक तालुक्यात  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध केले आहेत. एखाद्या रूग्णावरावर उपचारासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता भासल्यास गोवा क्रिकेट संघटनेच्या क्लबकडे संपर्क साधावा असे आवाहन गोवा क्रिकेट संघटनेने केले आहे.

Advertisements

यासंबंधी शनिवारी गोवा क्रिकेट संघटनेतर्फे वास्कोत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुरगाव तालुक्यासाठी दोन अक्सिजन कॉन्सेन्टेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.   महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आजही अनेक कोरोना रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे सामाजीक बांधीलकीच्या माध्यामातून संघटनेतर्फे 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर गोवा क्रिकेट संघटनेशी संलग्नीत क्लबना प्रत्येक तालुक्यात मोफत देण्यात येत आहेत. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे सचिव विपुल फडके, सदस्य मोहन चोडणकर, क्युरेटर सुर्यकांत नाईक, संघटनेचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. बबन परूळेकर, माजी खजिनदार जमीर करोल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. परूळेकर यांनी कोरोना रूग्णावर उपचार करताना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा कसा उपयोग करावा यासंबंधी माहिती उपस्थित क्लबच्या सदस्यांना दिली. मुरगांव, वास्को, नवेवाडे, दाबोळी, कुठ्ठाळी व इतर भागात एखाद्या कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज भासल्यास त्यांनी बायणा वास्को येथील परूळेकर इस्पितळाशी संपर्क साधावा. तसेच कोरोना रूग्णाच्या नातेवाईकानी किंवा मित्रानी मुरगांव तालुक्यातील अल फताह क्रिकेट क्लब, युथ क्लब वास्को, वास्को सिटी क्लब, नुरानी स्पोर्टस् क्लब, पॅरामाऊंट क्रिकेट क्लब, जेटी क्रिकेट क्लब, बोगदा क्रिकेट क्लब, बोगदा युथ क्लब, हिलटॉप क्रिकेट क्लब, नवेवाडे क्रिकेट क्लबच्या सदस्यांशी संपर्क साधावा. प्रारंभी जमीर करोल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी रणजीपटू सी. अशोक यांनी आभार मानले.

Related Stories

ट्रकखाली सापडल्याने दुचाकीचालक युवती ठार

Patil_p

कर्नाटक सरकार विरोधात गोव्याची अवमान याचिका

Patil_p

गोमंतकीय प्रवाशांकडून पैसे घेऊ नये

Omkar B

सेरुला कोमुनिदाद जागेत भराव टाकल्या प्रकरणी कारवाई करा

Patil_p

जलप्रलयामुळे दोन हजार कोटींचे नुकसान

Amit Kulkarni

नियोजन लुटीचेच, पर्यावसान खूनात!

Patil_p
error: Content is protected !!