तरुण भारत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स

ऑनलाईन टीम / मुंबई : 


भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज (29 जून) दुसऱ्यांदा सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी सकाळी अकरा वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहेत. 

Advertisements


दरम्यान, ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले हाेते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चाैकशीला जाण्याचे टाळले होते. 


या प्रकरणात  ईडीने अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांना अटक केली असून सध्या ते दोघेही ईडीच्या ताब्यात आहेत.


त्यानंतर आता ईडीने पुन्हा नव्याने समन्स बजाविताना मुंबईतून झालेल्या हप्तावसुलीबाबत चौकशी करायची असल्याचे नमूद करीत मंगळवारी (29 जून) 11 वाजता हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत. त्यामुळे आज देशमुख चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

छ. शाहू महाराजांच्या नावे कोल्हापूरात क्रीडा विद्यापीठाची स्थापना करा – खासदार माने

triratna

सांगली : बिळाशीतील महिलेचा मृत्यूनंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

triratna

पीएम मोदी ‘परीक्षा पे चर्चा ’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी साधणार संवाद

triratna

म्युकरमायकोसिससाठी केंद्र सरकारकडून साथीचा रोग नियंत्रण कायदा लागू

triratna

जिल्ह्यात मान्सुन सक्रीय

Patil_p

कोल्हापूर : सायंकाळपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय

triratna
error: Content is protected !!