तरुण भारत

केएलईमध्ये ब्लॅक फंगसवर उपचार सुरू

आतापर्यंत 115 रुग्णांवर उपचार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये ब्लॅक फंगसच्या पहिल्या रुग्णावर 5 मे 2021 रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. हॉस्पिटलचे ईएनटी तज्ञ डॉ. ए. एस. हारुगोप्प व नेत्रतज्ञ डॉ. अरविंद तेनगी यांनी अन्य डॉक्टरांच्या सहकार्याने ब्लॅक फंगसवर उपचार सुरू केले आहेत. आजपर्यंत 115 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

याशिवाय 200 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 3 ऑपरेशन थीएटरमध्ये सतत शस्त्रक्रिया सुरू आहेत. हॉस्पिटलचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, काहेर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, वैद्यकीय निरीक्षक डॉ. एम. व्ही. जाली, प्राचार्य एन. एस. महांतशेट्टी, वैद्यकीय निरीक्षक आरिफ मालदार यांनी सर्व सुविधा पुरविल्या आहेत. कोविडपूर्वी गेल्या दहा वर्षात हॉस्पिटलमध्ये ब्लॅक फंगसच्या 42 व यलो फंगसच्या 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कोविड-19 च्या दुसऱया लाटेत 115 जणांवर उपचार करण्यात आले. डॉ. हारुगोप्प यांच्यासमवेत डॉ. शमा बेल्लद, डॉ. डी. एस. पुनीत नायक, डॉ. प्रीती हजारे, डॉ. प्रीती शेट्टी रुग्णांवर उपचार करीत आहेत.

Related Stories

परिवहन कर्मचाऱयांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

Patil_p

प्रगत तंत्रज्ञानाबरोबर भामटय़ांनीही साधलीय प्रगती!

Omkar B

महिलेला लुटणाऱया टोळीतील आणखी एकाला अटक

Patil_p

परवानगी न घेतलेल्या खेळाडूंवर कारवाई होणार

Amit Kulkarni

‘त्या’ निष्पाप तरुणांच्या कुटुंबीयांची शहर म. ए. समितीने घेतली भेट

Amit Kulkarni

शिक्षकांना सरकारी सोयी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

Patil_p
error: Content is protected !!