तरुण भारत

कोकोनेट मोहन पॅक

मैत्रिणींनो, आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत. या दिवसात नैवेद्यासाठी वैविध्यपूर्ण पदार्थ केले जातात. तुम्ही कोकोनट मोहन पाक करायला हरकत नाही.

साहित्य : सुक्या खोबर्याचा कीस एक कप, पाऊण कप दूध, पाऊण कप कंडेन्स्ड मिल्क, अर्धा चमचा वेलची पूड, अर्धा चमचा गुलाब पाणी, एक चमचा साखर, दोन ते तीन चमचे तूप, चिमूटभर ऑरेंज पावडर, आठ ते दहा काजू, थोडय़ा टूटीफ्रुटी.

Advertisements

कृती : एका कढईत किंवा जाड बुडाच्या भांडय़ात दूध गरम करून घ्या. या दुधात खोबर्याचा कीस घालून तासभर भिजवून घ्या. आता एक कढईत घ्या. त्यात तूप घाला.  तूप गरम झाल्यावर त्यात दुधात बुडवून ठेवलेला खोबर्याचा कीस घालून परतून घ्या. यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क, वेलची पूड आणि साखर घाला. काही वेळानंतर या मिश्रणावर तुपाचा तवंग दिसू लागेल. मग गॅस कमी करून त्यात गुलाब पाणी, ऑरेंज पावडर आणि काजूचे तुकडे घाला.

दोन मिनिटांनी गॅस बंद करा. त्याआधी एका ताटलीला किंवा ट्रेला तूप किंवा तेल लावून घ्या. मिश्रण थोडं थंड झाल्यावर ताटलीत काढा. थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर वडय़ा कापून घ्या. त्यावर टूटीफ्रूटी घालून सजावट करा.

Related Stories

क्रिस्पी व्हेजिटेबल्स

Omkar B

थंडगार गुलाब फिरनी

Omkar B

ओट्स कुकीज

Omkar B

बदामी पनीर

tarunbharat

मसाला शेवगा

Omkar B

सोया टिक्की

tarunbharat
error: Content is protected !!