तरुण भारत

सांगली : कुपवाड एमआयडीसीत ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरले; एक ठार, एक जखमी

कुपवाड / प्रतिनिधी 

कुपवाड एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ठोकरल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यात जोराची धडक बसुन चाकाखाली सापडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर मागे बसलेला एकजण जखमी झाला आहे. स्मशानभूमी समोरील चौकात हा अपघात झाला असून याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.

अपघातात दगडू नामदेव कोळी (वय ३५, रा.स्वामी मळा, कुपवाड. मूळ आरळी ता.मंगळवेढा जि.सोलापूर) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून दत्तात्रय प्रभाकर गवळी (वय २४,रा. स्वामी मळा, कुपवाड मूळ गाव आरळी ता.मंगळवेढा) हा जखमी झाला आहे.अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी सायंकाळी त्याला अटक केली. संशयित अनिल अशोक जाधव (४०, रा. गोठण गल्ली, मिरज) असे चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अपघातातील ट्रक वाळू वाहतुकीसाठी वापरला जातो. मात्र, अपघातावेळी ट्रकमध्ये वाळू न्हवती, असे पोलिसांनी सांगितले.

Advertisements

Related Stories

सांगली : इस्लामपुरातील डॉ. सांगरुळकर यांच्या हॉस्पिटलची कसून चौकशी

triratna

सांगलीतील वृद्ध महिलेची महिनाभराच्या ताटातूटीनंतरनंतर तिच्या कुटुंबीयांशी झाली भेट

triratna

प्राणीप्रेमींमुळे बिऊर येथे नागास जीवदान

triratna

संग्रामसिंग देशमुख पुणे पदवीधरचे भाजप उमेदवार

triratna

सांगली : वाळव्यात मंत्र्याचे डिजिटल पोस्टर फाडल्याने तणावाचे वातावरण

triratna

सांगली : कडेगाव तालुक्यातील लसीवर इतर तालुक्यातील लोकांचा डल्ला

triratna
error: Content is protected !!