तरुण भारत

फॅशन उद्योगामध्ये तेजी

जवळपास 50 टक्क्यांच्या तेजीची प्राप्ती- ई-कॉमर्समुळे मजबूत कामगिरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कोरोनाच्या संकटामुळे विविध उद्योगधंदे मोठय़ा प्रमाणात अडचणींना तोंड देत असले तरी, दुसऱया बाजूला ऑनलाईन व्यवसायांच्या मदतीने काही क्षेत्रांनी मजबूत कमाई केली आहे. यामध्येच ऑनलाईन फॅशन उद्योगाने कोरोना संकटात जवळपास 51 टक्क्यांची तेजी प्राप्त केली असल्याची माहिती आहे. सदरची आकडेवारी ही  युनीकॉमर्सच्या अहवालामधून सादर करण्यात आली आहे.

या तेजीमध्ये प्रामुख्याने टायर-3 च्या खालोखाल असणाऱया शहरांमधील ऑर्डरमध्ये सर्वाधिक तेजी राहिली असून हा आकडा 192 टक्क्यांवर पोहोचला आहे. सदरच्या विक्रीत लहान मुलांच्या कपडय़ांची विक्री सर्वाधिक राहिली आहे ज्याचा आकडा 200 टक्क्यांपेक्षा अधिकचा आहे. फॅशन ब्रँड्समध्ये थेट कंपनीकडून ग्राहकांपर्यंत साहित्य तेजीने कंपनीने पोहोचविले आहे. यामुळे कंपन्यांसोबत ग्राहकांचे नाते मजबूत होण्यास मदत झाली आहे.

फॅशन क्षेत्राचे योगदान

भारतामधील ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक योगदान हे फॅशन क्षेत्राचे राहिले असल्याचे युनीकॉमर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) कपील मखीजा यांनी सांगितले आहे.

Related Stories

ऍपलचा पहिला फोल्डेबल आयफोन 2022 मध्ये

Omkar B

स्मार्टफोन शिपिंगमध्ये पाच शहरांची हिस्सेदारी

Patil_p

‘विप्रो-टीसीएस’च्या नफा कमाईचे आकडे सादर

Amit Kulkarni

पेटीएमकडून पोस्टपेड सेवांचा विस्तार

Patil_p

गोल्ड ईटीएफच्या गुंतवणुकीत घसरण

Patil_p

मागील सहा वर्षात दुध उत्पादनात वाढ

Patil_p
error: Content is protected !!