तरुण भारत

ट्विटर इंडियाच्या ‘एमडी’ विरोधात दुसरा एफआयआर

उत्तरप्रदेश पोलिसांची सर्वोच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisements

ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात उत्तरप्रदेशात आणखीन एक एफआयआर नोंद झाला आहे. ट्विटरच्या संकेतस्थळावर भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याप्रकरणी बुलंदशहरमध्ये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पण वाढता वाद पाहून ट्विटरने सोमवारीच स्वतःची चूक सुधारली होती. पण तत्पूर्वी दाखविण्यात आलेल्या नकाशात केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दर्शविण्यात आले होते.

माहेश्वरींच्या विरोधात बुलंदशहरमध्ये बजरंग दलाचे नेते प्रवीण भाटी यांच्याकडून तक्रार नोंदविण्यात आली होती. नव्या आयटी नियमांवरून पूर्वीपासुन सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ट्विटरच्या विरोधात उत्तरप्रदेशात चालू महिन्यात हा दुसरा एफआयआर नोंद झाला आहे. यापूर्वी नोंद एका प्रकरणी माहेश्वरी यांना मागील आठवडय़ात कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता. पण उत्तरप्रदेश पोलिसांनी याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

यापूर्वी गाजियाबाद पोलिसांनी माहेश्वरी यांना 17 जून रोजी नोटीस बजावून 7 दिवसांमध्sय हजर राहण्यास सांगितले होते. मुस्लीम वृद्धाला मारहाण आणि गैरवर्तनाशी संबंधित हे प्रकरण होते. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्यावर माहेश्वरी समवेत 9 जणांच्या विरोधात एफआयआर नोंद झाला होता. या सर्वांवर घटना चुकीच्या पद्धतीने सादर करणे आणि सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने माहेश्वरी यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे.

पोलीस अन् ट्विटर आमने-सामने

उच्च न्यायालयाच्या आदेशाला उत्तरप्रदेश पोलिसंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर उत्तरप्रदेश सरकारच्या याचिकेवेळी आमची बाजूही ऐकली जावी असे माहेश्वरी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅविएट दाखल करत म्हटले आहे.

ट्विटरची आगळीक

ट्विटरने माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे हँडल शुक्रवारी सकाळी एक तासासाठी ब्लॉक केले होते. प्रसाद यांनी अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ऍक्टचे उल्लंघन केल्याचे कारण याकरता देण्यात आले हेते. पण नंतर ट्विटरने प्रसाद यांचे हँडल पुन्हा सुरू केले होते. या मुद्दय़ावरूनही सरकार आणि ट्विटर समोरासमोर उभे ठाकले होते.

Related Stories

कोरोना : दिल्लीत 4266 नवे रुग्ण; 21 मृत्यू

Rohan_P

निवडणुकांची घोषणा होताच ईडीच्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

Abhijeet Shinde

रामायण एक्स्प्रेसमधील गणवेशावरून वाद

Patil_p

देशात दिवसभरात 18,987 रुग्ण

Amit Kulkarni

कोरोना : आजपासून पंजाबसह ‘या’ 4 राज्यांमध्ये लसीची ट्रायल

Rohan_P

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 7 लाखाचा टप्पा

datta jadhav
error: Content is protected !!