तरुण भारत

मालिकेत बरोबरीसाठी भारतीय महिला संघाचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ टाँटन

यजमान इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेत इंग्लंडने पहिला सामना जिंकून आघाडी मिळविली आहे. बुधवारी या मालिकेतील होणाऱया दुसऱया सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघ विजय मिळवून बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता या डे-नाईट सामन्याला प्रारंभ होईल.

Advertisements

या मालिकेतील गेल्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाची सर्वच विभागातील कामगिरी असाधानकारक झाली. या सामन्यात भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाहीत. 201 धावा जमविताना भारतीय फलंदाजांनी 181 डॉट बॉल्स खेळले होते. पुढील वर्षीच्या प्रारंभी न्यूझीलंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाला आतापासूनच कसून सराव करताना सर्वच विभागामध्ये लक्ष द्यावे लागेल. बुधवारच्या दुसऱया सामन्यासाठी भारतीय संघामध्ये काही बदल केले जाणार आहेत. पुनम राऊतच्या जागी जेमिमा रॉड्रिग्जला संधी दिली जाईल, असा अंदाज आहे. आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टिकोनातून संघातील काही ज्येष्ठ क्रिकेटपटूंना स्वतःहून बाजूला होत नवोदिताना संधी द्यावी लागेल. मिताली राज, पुनम राऊत हे भारतीय संघातील ज्येष्ठ अनुभवी खेळाडू आहेत.

2017 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने तीनवेळा 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या दर्जेदार संघांशी लढत देताना भारतीय महिला संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखावे लागेल. आधुनिक क्रिकेटमध्ये 180 डॉट बॉल्स टाकले जातात हे रूचत नाही, असे मत भारताची माजी कर्णधार डायना एडलजीने व्यक्त केले आहे. मिताली राजने पहिल्या सामन्यात 72 धावा जमविल्या पण तिला फलंदाजीचा स्ट्राईक रेट सुधारण्याची गरज आहे. भारताच्या टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी झगडत आहे. ब्रिस्टॉलच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने केवळ एकता बिस्तला फिरकी गोलंदाज तसेच तीन वेगवान गोलंदाजांना खेळविले होते. शिखा पांडेचे इंग्लंड दौऱयासाठी संघात पुनरागमन झाले. पण पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना ती रोखू शकली नाही. दुसऱया सामन्यात शिखा पांडेला वगळले जाण्याची शक्यता आहे. तिच्या जागी अरूंधती रेड्डीला संघात स्थान दिले जाईल, असा अंदाज आहे. बुधवारच्या सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांना खेळविण्याचा सल्ला एडलजीने दिला आहे.

भारत- मिताली राज (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, पूनम राऊत, हरमनप्रित कौर, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया, स्नेह राणा, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, रॉड्रिग्ज, अरूंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार, एकता बिस्त, राधा यादव, पुनम यादव, प्रिया पुनिया, इंद्राणी रॉय.

इंग्लंड- नाईट (कर्णधार), ब्युमाँट, क्रॉस, स्किव्हर, डंकली, विनफिल्ड-हिल, श्रबसोल, ब्रंट, एक्लेस्टोन, जोन्स, डेव्हिस, फॅरेंट, ग्लेन, व्हिलेर्स, विल्सन, ग्लेन अर्लोट.

Related Stories

वर्णद्वेषी टिपणी करणाऱया प्रेक्षकांची हकालपट्टी

Patil_p

वर्णद्वेषविरोधी मोर्चात ब्रेथवेटचा समावेश

Patil_p

जीव मिल्खा सिंग दुबई गोल्डन व्हिसाने सन्मानित

Patil_p

हॉटेल रुमच्या ‘त्या’ वादात तथ्य नाही

Patil_p

फ्रान्सच्या एकतर्फी विजयात एम्बापेचे विक्रमी 4 गोल

Patil_p

युरो फुटबॉल सामन्यांसाठी 14 हजार प्रेक्षकांना परवानगी

Patil_p
error: Content is protected !!