तरुण भारत

खेड येथून दोन लाख रुपयांचे दागिने लंपास

प्रतिनिधी/सातारा

  खेड, ता. सातारा येथील सहकार नगरमध्ये अज्ञात चोरटय़ांनी घरफोडी कडून 2 लाख 7 हजार 750 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. यामध्ये 15 हजार रूपये रोख रकमेचा समावेश आहे.

Advertisements

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 जुन रोजी 2. 15 ते दि. 29 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास खेड ता सातारा येथील सहकार नगरमध्ये तेथीलच मुबारक महम्मद सय्यद वय 60 यांच्या राहत्या घराच्या खोलीच्या दरवाजाची कडी कोयंडा कशाचा तरी साह्याने तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरटय़ांनी 62 हजार रुपये किमतीच्या अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या अंगठय़ा, 25 हजार रुपये किमतीची एक तोळे वजनाचे सोन्याची चैन, 31 हजार 250 रुपये किमतीची एक तोळा  वजनाची सोन्याची गलसर, 25 हजार रुपये किमतीचे एक तोळे वजनाचे गंठण, 12 हजार 500 रुपये किमतीचे अर्धा तोळे वजनाचे सोन्याची बोरमाळ, 20 हजार रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पदक, 12 हजार 500 रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे गाण्यातील फॅन्सी टॉप, 4 रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट आणि 15 हजार रुपये  रोख रक्कम असे एकूण सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 7 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरटय़ांनी हस्तगत केला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

साताऱ्यामध्ये पुन्हा ‘रोल, कॅमेरा, अॅक्शन

Abhijeet Shinde

महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही: फडणवीस

Abhijeet Shinde

सातारकरांना सोशल डिस्टन्सिंगचा अर्थ कळेना

Patil_p

शाहूपुरी पोलिसांकडून मोबाईल, दुचाकी चोरटयांची टोळी अटक

Abhijeet Shinde

पालिकेला कर्मचाऱयांचा सत्कार करण्याचा विसर

Patil_p

सातारा पालिकेच्या विषय समिती निवडीची विशेष सभा पुढील आठवड्यात

datta jadhav
error: Content is protected !!