तरुण भारत

खोतोडा ग्रामपंचायत सरपंचपदी संतोष गावकर यांची बिनविरोध निवड

यावेळी त्यांचे अभिनंदन करताना सहकारी पंच सभासद व नागरिक

प्रतिनिधी / वाळपई

Advertisements

कोविड नियंत्रण व्यवस्थापन गोव्यामध्ये व्यवस्थित झाले नाही. यामुळे जवळपास 3 हजार जणांना दुर्दैवी मरण आले. त्याला पूर्णपणे भाजपची निष्क्रियता जबाबदार आहे. दुसऱया लाटेची पूर्वतयारी करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाचे ज्ये÷ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले होते. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यामुळे आज देशामध्ये मोठय़ा प्रमाणात हाहाकार निर्माण झालेला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी भाजपची यंत्रणा पूर्णपणे कमी पडली असा आरोप गोवा महिला प्रदेशाध्यक्षा बिना नाईक यांनी केला. वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपावर सडकून टीका केली व येणाऱया काळात काँग्रेस पक्षाची यंत्रणा मजबूत होणार असून पुढील विधानसभेत काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा केला.

वाळपई महिला काँग्रेस अध्यक्षा रोशन देसाई यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बिना नाईक यांनी वाळपई मतदारसंघांमध्ये महिलांना सोशल मीडिया हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे घोषित केले व त्याची सुरुवात आजपासून होणार असल्याचे सांगितले. वाळपई मतदारसंघातील महिलाना जागृत करून सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाचा निष्काळजीपणा जनतेसमोर आणण्यासाठी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी उत्तर व दक्षिण गोव्यासाठी सोशल मीडिया प्रशिक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. वाळपईमध्ये महिला काँग्रेसचे काम चांगले आहे. महिला अध्यक्ष रोशन देसाई यांनी इतर महिलांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाची चळवळ चांगल्या प्रकारे उभारलेली आहे. येणाऱया विधानसभेत काँग्रेस पक्षाने महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केलेली आहे. वाळपई मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या 350 जास्त आहे. यामुळे या भागात महिला मतदान खऱयार्थाने परिवर्तन घडवून आणील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केले.

वाढती महागाई, पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे मात्र सरकारला काही पडलेले नाही. नोकऱयांचे गाजर दाखवून मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न विद्यमान सरकार करीत आहे. मात्र सुशिक्षित जनतेने भाजपा सरकारचा डाव ओळखलेला आहे. येणाऱया काळात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला जनता चांगलाच धडा शिकवेल असे यावेळी त्या म्हणाल्या. यापूर्वी बेरोजगारी हटविण्यासाठी पक्षाने चांगले कार्य केलेले आहे. वाळपई मतदारसंघातील महिलांना सक्रिय करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील असे बिना नाईख यांनी स्पष्ट केले.

यावेळी महिला अध्यक्षा रोशन देसाई यांनी सांगितले की, बिना नाईक यांनी वाळपईच्या मतदारसंघांमध्ये चांगले लक्ष घातलेले आहे. महिला सशक्तिकरण करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

नाताळासाठी गोवेकर सज्ज

Omkar B

राजधानीतील अनेक मंदिरांचे निर्जंतुकीकरण

Omkar B

भूमिपुत्र विधेयक मागे घेणार : मुख्यमंत्री

Amit Kulkarni

स्वच्छता अभियानावर वास्कोत चर्चा

Patil_p

पर्यटन व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन

Amit Kulkarni

सासष्टीत शेती – बागायती, खासगी मालमत्तांचे 34 लाखांचे नुकसान

Amit Kulkarni
error: Content is protected !!