तरुण भारत

पेट्रोल व डिझेलची शंभरीकडे वाटचाल

पेट्रोल 97 तर डिझेल 95 रुपये लिटर

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

मे-जून या दोन महिन्यात सुमारे 33 वेळा पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाली असून दोन्ही इंधनाचे दर सरासरी रु. 9 ते 10 ने वाढले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या वाढणाऱया दरात गेल्या दोन महिन्यात इंधन दरात एकदाही कपात झालेली नाही. गोव्यात सध्या पेट्रोलचे व डिझेलचे सरासरी दर प्रति लिटर अनुक्रमे रु. 97 व रु. 95 एवढे आहेत.

प्रति दिन किंवा एक दिवसाआड 20 ते 30 पैशांनी दोन्ही इंधनांची दरवाढ चालू असून सदर वाढ अशीच चालू राहिली तर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात गोव्यात दोन्ही इंधनांचे दर शंभरी गाठतील असा अंदाज आहे.

गोवा  शेजारी असलेल्या महाराष्ट्र राज्यात पेट्रोलने शंभरी कधीच गाठली असून त्याचा दर प्रतिलिटर रु. 105 झाला आहे तर डिझेल शंभरीच्या उबंरठय़ावर आहेत. गोव्यात ‘व्हॅट’मुळे दोन्ही इंधनांनी अद्याप शंभरी गाठलेली नाही परंतु सध्या दरवाढीचा कल पाहिला तर येत्या एक – दोन आठवडय़ात दोन्ही इंधनांची शंभरी पूर्ण होणार असा अंदाज आहे.

रु. 1 व रु. 2 नी इंधन दरवाढ झाली तर ती पटकन लक्षात येते. परंतु तेल कंपन्यांनी दरवाढ रुपयात न करता ती 20 ते 30 पैसे अशी किरकोळ चालू ठेवल्याने गेल्या 2 महिन्यात दोन्ही इंधनांची शंभरी कधी गाठली आणि ते शंभरीकडे केव्हा पोहोचले ते कळलेच नाही. ‘थेंबे थेंब तळे साचे’ या उक्तीप्रमाणे पैशापैशाने इंधन वाढले आहे आणि वाढत आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुचकामी असल्याने वैयक्तिक वाहनांशिवाय लोकांना पर्याय नाही आणि त्यांना एक – दोन – तीन दिवसांनी तरी वाहनात इंधन भरावेच लागते नाहीतर सगळेच ठप्प होते, अशी परिस्थिती आहे.

Related Stories

वे. प्रभाकरशास्त्री बाक्रे यांचे निधन

Amit Kulkarni

तटरक्षक दलाची तातडीच्या मदतीसाठी व्यापारी जहाजाकडे धाव

Amit Kulkarni

कोरोनाबाधितांची संख्या होतेय कमी

Amit Kulkarni

गोव्यातील प्रत्येक घराला 31 मार्च पर्यंत शौचालय, वीज व पाणी पुरवठा

Patil_p

दृष्टीच्या संपकारी जीवरक्षकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Omkar B

आत्मध्वजाचे विस्मरण झाल्याने भारतात अंधकार व समस्या निर्माण झाल्या- प्रा. अनिल सामंत

Amit Kulkarni
error: Content is protected !!