तरुण भारत

कारिटस इंडिया, बेळगाव डायोसीसतर्फे बिम्सला 25 ऑक्सिजन कॉन्सन्टेटर

प्रतिनिधी /बेळगाव

कारिटस इंडिया, न्यू दिल्ली व बेळगाव डायोसीस सोशल सर्व्हिस सोसायटी यांच्यावतीने बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलला 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स व इतर साहित्य देण्यात आले. अंदाजे 50 लाख रुपयांचे हे साहित्य बिम्स प्रशासनाकडे देण्यात आले.

Advertisements

कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये नागरिकांची सेवा व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगावचे बिशप डॉ. डेरीक फर्नांडिस अध्यक्षस्थानी होते. तर खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, रिजनल कमिशनर अमलान आदित्य विश्वास, बिम्सचे संचालक डॉ. उमेश कुलकर्णी उपस्थित होते. 50 कॉन्सन्ट्रेटरसह 50 हय़ुमीडिफिअर्स, 50 ऑक्सिजन मास्क, 50 नासल कॅनुलास, 25 व्होल्टेज कॉन्सन्ट्रेटर असे साहित्य बिम्सला देण्यात आले.

या कार्यक्रमात बोलताना बिशप डेरीक फर्नांडिस यांनी डॉक्टर, नर्सेस तसेच इतर आरोग्य कर्मचाऱयांच्या कार्याचे कौतुक केले. मानवतेसाठीचे केलेले हे कार्य सर्वांच्याच कायमचेच लक्षात राहील. तसेच बिम्सला देण्यात आलेले हे साहित्य अनेक गरजू व गरीब लोकांच्या मदतीला येईल, असे त्यांनी सांगितले. फादर युसीबीओ फर्नांडिस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध मान्यवर व ख्रिश्चन बांधव उपस्थित होते.

Related Stories

तिसऱया दिवशी 88 शिक्षकांच्या बदल्या

Amit Kulkarni

महाविद्यालयांची गुणवत्ता वाढीसाठी ट्रिपल-ए ऑडिटची गरज

Omkar B

शनिवारी कोरोनाचे 56 नवे रुग्ण

Patil_p

स्मारक स्वच्छता अभियान

Patil_p

कर्ले-बेळवट्टीचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर

Omkar B

1 नोव्हेंबर रोजी तालुक्मयात कडकडीत हरताळ

Patil_p
error: Content is protected !!