तरुण भारत

”पंजा फक्त टायगरकडे असतो अन् तो आता काँग्रेसमय झाला आहे”


मुंबई \ ऑनलाईन टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवन येथे ‘राष्ट्रीय बंजारा टायगर्स’ संघटनेचे काँग्रेस पक्षात विलिनीकरण करण्यात आले. या संघटनेचं पक्षात स्वागत करताना नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. ‘टायगर’ अर्थात वाघाला इलाका नसतो. पंजा फक्त टायगरकडे असतो आणि तो आता काँग्रेसमय झाला आहे’, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लगावला.

काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळा येथे ओबीसी चिंतन बैठकीत ‘आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो’, असं विधान केलं होतं. त्यानंतर आज नाना पटोले पटोले यांनीही टायगर म्हणजेच वाघ आता काँग्रेसमय झाला आहे, असे वक्तव्य केले. यानंतर मात्र उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.

नाना पटोले यांच्या उपस्थितीत टिळक भवन येथे राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आ. राजेश राठोड, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार, डॉ. गजानन देसाई, रामकिशन ओझा, वाल्मीक पवार, लक्ष्मणराव भुरे,एनएसयुआयचे अमीर शेख आदी उपस्थित होते.

Related Stories

विधान मंडळांच्या विविध समिती सदस्यांची निवड

Patil_p

कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजपात प्रवेश

datta jadhav

अयोध्या : राम मंदिराच्या पायाभरणीस प्रारंभ

datta jadhav

भाजपकडून विधान परिषदेसाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांना उमेदवारी

Abhijeet Shinde

पुणे विभागातून 1 लाख 69 हजार प्रवासी परराज्यात रवाना

datta jadhav

सैनिक टाकळी परिसरात कोरोनामुळे दोन मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!