तरुण भारत

खेलरत्न पुरस्कारासाठी ‘या’ दोन खेळाडूंची बीसीसीआयकडून शिफारस


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम


भारतीय क्रिकेट बोर्डाने देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारासाठी अनुभवी महिला क्रिकेटर मिताली राज आणि भारताचा नंबरवन फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांच्या नावांची शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह यांची नावे देण्यात आली आहेत.

वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, आमची सविस्तर चर्चा झाली आणि अश्विन आणि मिताली राज यांची नावे खेलरत्नसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्जुन पुरस्कारासाठी बोर्ड सीनियर फलंदाज शिखर धवन, केएल राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांची नावे पाठवण्याती आली आहेत.

मितालीने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 वर्षे पूर्ण केली. 38 वर्षीय मिताली एकदिवसीय सामन्यात सात हजाराहून अधिक धावा करणारी सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मितालीप्रमाणेच अर्जुन पुरस्कार जिंकणार्‍या अश्विननेही कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 79 कसोटी सामन्यांत 413 विकेट घेतल्यात. याव्यतिरिक्त त्याने वन डे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे 150 आणि 42 गडी बाद केलेत. मात्र, सध्या तो छोट्या प्रकारात भारताकडून जास्त खेळत नाही. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अश्विन सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

धवन श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेत भारताचा कर्णधार असेल आणि अर्जुन पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे. या फलंदाजाने 142 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5977 धावा केल्या असून कसोटी क्रिकेट आणि टी -20 सामन्यात भारतासाठी अनुक्रमे 2315 आणि 1673 धावा केल्या आहेत. त्यामुळे यावेळी धवनला पुरस्कार देण्यात यावा अशीच सर्वांची इच्छा आहे.

Related Stories

‘यास’च्या थैमानात लाखो लोक बेघर

Patil_p

खासगीकरणासाठी तज्ञांची समिती स्थापणार

Patil_p

किंग्स इलेव्हन पंजाबचे नवे नाव ‘पंजाब किंग्स’

Patil_p

रणिंदर सिंग यांची अध्यक्षपदी फेरनिवड

Patil_p

बिग बॅश स्पर्धेत बेअरस्टोचे पदार्पण

Patil_p

बाधिताच्या घराबाहेर फलक लावू नयेत!

Omkar B
error: Content is protected !!