तरुण भारत

राज्यात भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा संकल्प

मुख्यमंत्री येडियुराप्पा यांची प्रतिक्रिया

प्रतिनिधी /बेंगळूर

Advertisements

पुढील सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात 130 हून अधिक जागांवर विजय मिळवून भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्याचा संकल्प केला आव्हान आहे. त्यासाठी आतापासूनच सर्व तऱहेचे प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले आहे.

बुधवारी राजभवन येथे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यपालांच्या डोळय़ाचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे विचारपूस करण्यासाठी आपण त्यांची भेट घेतली आहे, असे ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात 130 हून अधिक जागा मिळवून भाजपला सत्तेवर आणण्याचा आपण संकल्प केला आहे. आतापासूनच त्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात येतील. पुढील दोन वर्षातही चांगल्या पद्धतीने कामे करणार असल्याचे आश्वासन राज्यातील जनता आणि भाजप कार्यकर्त्यांना देत आहे. 10-12 जिल्हय़ांचा दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Related Stories

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ प्रतिज्ञा

Abhijeet Shinde

पंधरा हजार वीज बिलांत केली सुधारणा

NIKHIL_N

कर्नाटकमध्ये कोरोना रुग्ण वाढीचे सत्र सुरूच; ८,१६१ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कर्नाटक : गणेशमूर्ती केवळ ३ दिवस ठेवता येणार, प्रत्येक प्रभागात एक मूर्तीः बीबीएमपी

Abhijeet Shinde

प्राध्यापिका चित्रा घोष यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Abhijeet Shinde

रुग्णवाहिका सेवेचा होणार कायापालट

Patil_p
error: Content is protected !!