तरुण भारत

राज्यात सक्रिय रुग्णसंख्या 76,505

प्रतिनिधी /बेंगळूर

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात बुधवारी 1,71,112 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 1.97 टक्के इतका आहे. दिवसभरात 3,382 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत 12,763 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 111 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

Advertisements

आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 28,43,810 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 27,32,242 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान एकूण 35,040 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 76,505 पर्यंत खाली आली आहे. म्हैसूर, हासन, मंडय़ा आणि मंगळूर जिल्हय़ांमध्ये कोरोना संसर्ग अद्याप कमी झालेला नाही.

Related Stories

पोटनिवडणूक निकाल: २ मे रोजी विजयी मिरवणुकीवर बंदी : निवडणूक आयोग

Abhijeet Shinde

राज्यात लॉकडाऊन की अनलॉक; मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

Abhijeet Shinde

“मी बंडखोर नाही, मी एकनिष्ठ आहे ” : मंत्री ईश्वरप्पा

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये बुधवारी ४२८ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

येडियुराप्पांच्या राजीनाम्यामुळे शेतकऱयाची आत्महत्या

Amit Kulkarni

कृषीमंत्री पाटील यांनी सिध्दरामय्यांवर साधला निशाणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!