तरुण भारत

यंदे खुट मार्गावर कचऱयाची समस्या

बेळगाव  : शहराची स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू असून विविध ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. मात्र दुसरीकडे शहरातील कचऱयाची समस्या प्रशासनासाठी डोके दुखी ठरत आहे. शहरात प्रवेश करणाऱया यंदे खुट मार्गावर कचऱयाची उचल न झाल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर किंवा शहराच्या प्रवेशद्वाराजवळ ठिकठिकाणी पडून असलेल्या कचऱयाकडे दुर्लक्ष झाल्याने कचरा समस्या गंभीर बनत आहे. या मार्गावर पडून असलेल्या कचऱयाकडे दुर्लक्ष केल्याने कचरा सर्वत्र विखुरला गेला आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्मार्ट शहरातील कचऱयाची समस्या सुटणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मार्गाने पश्चिम भागातील नागरिकांसह वाहनधारक शहरात प्रवेश करतात. शिवाय खासगी व परिवहन मंडळाच्या बसेस याठिकाणी प्रवाशांसाठी थांबत असतात. त्यामुळे प्रवाशांची सतत वर्दळ असते. मात्र रस्त्याच्या शेजारी पडून असलेल्या कचऱयामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याशेजारी बसणारे फेरीवाले व इतर विपेते शिल्लक असलेल्या वस्तू याठिकाणी टाकत असल्याने कचऱयात वाढ होत आहे. शहरातील कचऱयाची उचल करण्याकडे व व्यवस्थापनाकडे मनपा व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष झाले आहे. या मार्गावरील कचऱयाची त्वरित उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Related Stories

‘ट्वेंटी-ट्वेंटी’ स्टाईल लढतीत भाजपची बाजी

Amit Kulkarni

महाराष्ट्रात जाण्याची इच्छा कायम

Amit Kulkarni

निपाणीत ‘नागरिकत्व’ विरोधात एकजूट

Patil_p

घरपट्टी चलन वितरित करण्याचा अधिकार गोठवला

Patil_p

अनुसूचित जातीतून ‘त्या’ चार जातींना वगळा

Patil_p

कोल्ड्रिंक्स चालकांनाही आर्थिक मदत करा

Patil_p
error: Content is protected !!