तरुण भारत

क्लिनिकल बायोमार्कर सेंटरचे केएलईमध्ये आज उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

भारतात दरवषी 1 जुलै हा ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. कोलकात्याचे डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करताना समाजातील गरजू व्यक्तींसाठी डॉक्टर म्हणून बहुमोल सेवा दिली. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जातो.

Advertisements

जानेवारी 2015 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डॉ. बराक ओबामा म्हणाले होते, की ‘मी आज एक नवीन प्रिसिजन मेडिसिन इन्व्हेंटिव्हनेस सुरू करत आहे. ज्यामुळे कर्करोग आणि मधुमेह असे आजार नियंत्रणात आणण्यास मदत होते.’ सर्वांना उत्तम उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. आनुवंशिक आजार, नस आणि शिरांचे आजार, कर्करोग, मधुमेह अशा आजारांमध्ये उपचार करण्यासाठी ओबामा यांचे प्रयत्न मोलाचे ठरले.

प्रिसिजन मेडिसिन इन्व्हेंटिव्हनेस म्हणजेच वैद्यकीय क्षेत्रात अधिकाधिक संशोधन करणे आणि त्याचा रुग्णांना लाभ होण्यासाठी प्रयत्न करणे, अचूक चाचणी ही फार महत्त्वाची असते. त्यामुळेच प्रिसिजन मेडिसिनचे महत्त्व अधिक आहे. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये 2010 पासून डायबेटिस, सायंटिफिक कॉनक्लेव्ह इन न्यू पंटियर्सचे आयोजन केले जाते.

चेन्नईचे प्रख्यात संशोधक पद्मश्री प्रा. मोहन यांनी मधुमेहावर संशोधन करून वैद्यकीय क्रांतीला सुरुवात केली आहे. कदाचित, ‘बॉर्डरलेस बायॉलॉजी ब्रिदनिंग अपॉर्च्युनिटीज’ यावर काम करणारे ते पहिले भारतीय आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अकराव्या जागतिक मधुमेह परिषदेमध्ये डॉ. मोहन यांच्या काही खास संशोधनांचा उल्लेख झाला. त्याचवेळी केएलईमधील मधुमेहतज्ञ डॉ. एम. व्ही. जाली यांनी या परिषदेमध्ये भाषण करताना प्रिसिजन मेडिसिन इन्व्हेंटिव्हनेसचा उल्लेख केला.

‘डॉक्टर्स डे’ दिवशी म्हणजेच 1 जुलै 2021 रोजी क्लिनिकल बायोमार्कर सेंटरचे केएलई हॉस्पिटलमध्ये उद्घाटन होत आहे. डॉ. जाली म्हणतात, ‘जागतिक स्तरावर वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने संशोधन सुरू आहे. गुंतवणूक, उपचार आणि सतत संशोधन हे डॉक्टरांचे पुढील काळातील काम आहे.’डॉ. जाली हे मधुमेहतज्ञ तसेच हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आहेत. बी. सी. रॉय पुरस्काराचे ते मानकरी आहेत. 37 वर्षांपासून ते वैद्यकीय सेवेत रुजू आहेत. मधुमेह असोसिएशन ऑफ इंडियाने त्यांना पुरस्कार दिला असून सुवर्ण राज्योत्सव पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

Related Stories

कोरोनाग्रस्त आरोपीमुळे कॅम्प पोलीस स्थानकाला टाळे

Patil_p

गोमटेशजवळील ‘त्या’ गळतीकडे पाणी पुरवठा मंडळाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

बेंगळूरमध्ये लवकरच होणार ऑनलाईन मद्य विक्री

Abhijeet Shinde

सुपरस्पेशालिटी इस्पितळाचे बांधकाम धिम्यागतीने

Amit Kulkarni

राज्यातील 16.4 टक्के लोकांमध्ये प्रतिजैविके

Omkar B

भू-सुधारणा दुरुस्ती कायद्याविरोधात शेतकरी आक्रमक

Patil_p
error: Content is protected !!