तरुण भारत

बरे होऊनही चव ,वास येत नसल्यास

कोविडच्या तडाख्यात सापडल्यानंतर बहुतांश रुग्णांची चव आणि वासाची क्षमता कमी होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु कोरोनातून बरे होताना ही क्षमता पुन्हा येते.काही जणांना मात्र दीर्घकाळापर्यंत वास आणि चव येत नसल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. काही प्रकरणात तर काही रुग्णांना केवळ घाणीमुळे येणारा वास ओळखता आला.

ङशेवटी शरिरात वासाची आणि चव पुन्हा आणण्यासाठी ‘ऑल्फेक्टरी ट्रेनिंग’ मदत करते आणि हळूहळू आपल्या तोंडाला चव येऊ लागते.

Advertisements

वासाची क्षमता का हरवते?

 • सार्स कोव्ह-2 संसर्ग हा अनेकदा नाकात जातो आणि ऑल्फेक्टरी नर्व्हला बाधित करतो. हे तंत्र कोणत्याही वासाला मेंदूपर्यंत पोचवण्याचे काम करते.
 • संसर्गाच्या तावडीत सापडल्यानंतर ऑल्फेमेटरी नर्व्हचा मेंदूशी संपर्क तुटतो. त्यामुळे वास घेण्याची शक्ती निघून जाते.
 • जर्नल ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार,  बहुतांश रुग्णांची वास घेण्याची क्षमता ही सहा महिन्यात परत येऊ शकते.
 • केवळ पाच टक्केच प्रकरणात ऑल्फेक्टरी नर्व्हला कायमस्वरुपी बाधा झाल्याचे घडले आहे. परिणामी दीर्घकाळापर्यंत वास येत नसल्याची तक्रार राहू शकते.

उपाय काय?

 • अशा स्थितीत रुग्णांनी व्हिटॅमिन अ आणि अल्फा लिपोइड ऍसिडयुक्त खाद्य वस्तू, उदा. तांदूळ, ब्रोकली वाटाणे, बटाटे, गाजर, पालक, पत्ताकोबी, टोमॅटो, चीज, अंडे, पपई, आंबे, मासे, दूध, दही आदींचे सेवन करावे. हे अन्नघटक वास आणि तोंडाला चव आणण्यासाठी मदत करतात.
 • याचबरोबर कॉफी, परफ्यूम, जायफळ, नारळ, पुदीना, लवंग, निलगीरी, संत्रा, लिंबाच्या साली हे ऑल्फेक्टरी नर्व्ह पुन्हा सक्रिय करण्यास साह्यभूत ठरतात.
 • घरगुती उपचार फायद्याचे
 • तज्ञांच्या मते, घरगुती उपचार हे
  ऑल्फेक्टरी नर्व्हला सक्रिय करत मेंदूशी संपर्क साधण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करतात. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास या प्रक्रियेला आपण ऑल्फेक्टरी ट्रेनिंग असे म्हणू शकतो.
 • त्याच्या नियमित प्रयोगातून वास आणि चव येण्याची क्षमता हळूहळू विकसित होऊ शकते.

Related Stories

ऑक्सीमीटर आणि आपण

Omkar B

नखे खाताय

Amit Kulkarni

झोपेच्या गोळ्या घेताय

Amit Kulkarni

कॅफिन आणि आरोग्य

Amit Kulkarni

किडनीविकार ओळखण्यासाठी….

Omkar B

हृदयविकाराच्या धक्क्याची पूर्वसूचना देणार एक्सरे

Patil_p
error: Content is protected !!