तरुण भारत

‘पडळकर हे मनोरुग्ण, तेच भाजपची माती करणार’

प्रतिनिधी / सांगली

आमदार गोपीचंद पडळकर हा मनोरुग्ण राज्यभर काहीही बरळत फिरत आहे. प्रसिद्धीपिपासू असा हा नेता आहे. पडळकर ही पीडा भाजपची माती केल्याशिवाय राहणार नाही. ज्या व्यक्तीने जनतेला, समाजाला, देवाला फसवले, अशा व्यक्तीला फार प्रसिद्धी देऊ नका. मोठ्या नेत्यांना नावे ठेवण्याशिवाय दुसरं काम करत नाही, अशी टीका शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी पत्रकार बैठकीत केली.  

विभूते म्हणाले, गोपीचंद पडळकर हा केवळ प्रसिद्धीसाठी असले स्टंट करत असतो. त्याला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आघाडीमधील एक ही नेता त्याला गांभीर्याने घेत नाही. प्रसार माध्यमांनीही त्याला जास्त महत्व देऊ नये. दुर्लक्ष करावे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, बजरंग पाटील, मयुर घोडके, महिला आघाडीच्या सुजाता इंगळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

सांगली मनपा शाळेतील चिमुकले रमले आठवडी बाजारात; ग्राहकांची अलोट गर्दी

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेती केली पाहिजे : डॉ. विश्वजित कदम

Abhijeet Shinde

सांगली : शाहिरी लोककलेतून सुरेश पाटीलांचा प्रबोधनाचा जागर

Abhijeet Shinde

मिरजेतील तंतूवाद्यांना आता सप्तरंगांचा साज

Abhijeet Shinde

नांद्रेतील शेतकऱ्यांनी लोकवगणीतून सुरू केले रस्त्याचे काम

Abhijeet Shinde

सांगली : शिराळा तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!