तरुण भारत

सांगली : अपेक्स प्रकरणात आयुक्तांना सहआरोपी करा

हॉस्पिटलची सीआयडी चौकशी व्हावी, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांची मागणी

प्रतिनिधी / सांगली

मिरज येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये 87 रुग्ण मृत पावले आहेत. या मयत झालेल्या लोकांची मानवी तस्करी झालीय का? असा प्रश्न आहे. या गंभीर प्रकरणातील लोकांना फाशी झाली पाहिजे व आयुक्तांना या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी पत्रकार बैठकीत केली.

विभूते म्हणाले, मनपा आयुक्त आणि दोन आरोग्य अधिकारी यांनी अपेक्स केअर सेंटरला परवानगी दिलीच कशी? डॉ. महेश जाधव आणि मदन जाधव यांच्या अपेक्स हॉस्पिटलमध्ये कोणत्याही सेवासुविधा नाहीत. केवळ एका व्हेंटिलेटरवर 87 रुग्नांच्या जीवाची त्यांनी माती केली आहे. त्यांच्याकडे अत्यावश्यक सुविधा नसल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. याप्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सीआयडी चौकशीची शिफारस करावी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, तरच रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल.

यावेळी शंभूराज काटकर, बजरंग पाटील, मयूर घोडके, सुजाता इंगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

सांगली : निर्बंध कडक करा, पण व्यापार सुरू ठेवू द्या

Abhijeet Shinde

बागणीत मृत बिबट्याचे पिल्लू सापडल्याने खळबळ

Abhijeet Shinde

महामार्ग आणि पाणी योजना यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार- जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

नांद्रे, नावरसवाडी, डिग्रज व परिसरात बिबट्याचा वावर

Abhijeet Shinde

आरोग्य सेविकांना दमदाटी प्रकरणी दोघांवर गुन्हा

Abhijeet Shinde

सांगली : कचरावेचक महिलांचे कामाच्या ठेक्यासाठी एस एम एस आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!