तरुण भारत

कोरेगावचा जरंडेश्वर कारखाना ईडीकडून जप्त

राज्य बॅंक घोटाळा प्रकरण; अजित पवारांना मोठा झटका

प्रतिनिधी /सातारा

Advertisements

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चैकशी करण्याची मागणी करणारा प्रस्ताव भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत मंजुर करण्यात आला होता. याचीच काहीशी सुरूवात झाल्याचं चित्र आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाटगे यांच्या कंपनीच्या मालकीचा कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना तथा गुरू कमोडिटीज या साखर कारखान्यावर ईडीने बुधवारी कारवाई केली आहे.

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मामांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. राजेंद्र कुमार यांच्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सहकारी बँकेत जवळजवळ 25 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

साखर कारखान्यांच्या अनेक मालकांनी बँकेतून कर्ज घेऊन बुडवलं आहे. त्यानंतर साखर कारखान्यांची कमी भावात विक्री झाली असल्याची माहिती समजत आहे. यासंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्याप्रमाणे मुंबई  पोलिसांच्या आर्थिक गुन्हे  शाखेच्या पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गुह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करत त्यानुसार आज कारवाई केली.

दरम्यान, अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र,मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत अजित पवार आणि 65 जणांना क्लीन चिट देण्यात आली होती.

मात्र, 65  कोटी 75 लाख रूपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपाचा तपास ईडी करत होती. त्यानुसार बुधवारी ईडीने कोरेगाव तालुक्यातील अजित पवारांच्या नातेवाईकाच्या कंपनीचा हा कारखाना जप्त केला आहे. त्यामुळे अजित पवारांना मोठा झटका बसला असून ईडीच्या पुढील कारवाईकडे राज्याचे लक्ष लागून राहीले आहे.

गुरू कमोडिटीज बोगस ? या कारवाईबाबत ईडी ने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटमध्ये कारवाईचा तपशील येत असताना सदर कारखाना हा गुरू कमोडिटीज या बोगस कंपनीच्या नावाने चालवला असल्याची माहिती दिली.

Related Stories

कृष्णा रूग्णालयाची नेत्रदीपक कामगिरी

Patil_p

लक्ष्मीपूजनाच्या रात्राच दागिण्यांवर डल्ला

Patil_p

पहिली महिला कोरोना मुक्त झालेल्याला उलटले वर्ष

Amit Kulkarni

सातारा जिल्ह्यात 157 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 218 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

छोटा राजनची कोरोनावर मात

Patil_p

परप्रांतीय मुकेशचा आणखी एक कारनामा समोर

Patil_p
error: Content is protected !!